जम्मू काश्मीरात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

By admin | Published: March 7, 2016 08:45 AM2016-03-07T08:45:01+5:302016-03-07T08:45:01+5:30

कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्यात एक जवानदेखील जखमी झाला आहे

Jammu terrorists killed in encounter with security personnel | जम्मू काश्मीरात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू काश्मीरात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

Next
>ऑनलाइन लोकमत - 
जम्मू काश्मीर, दि. ७ - कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्यात एक जवानदेखील जखमी झाला आहे. सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरुच आहे. 
 
ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. दाऊद शेख असं या दहशतवाद्याचं नाव असून हिजबूलचा म्होरक्या बुरहानचा जवळचा साथीदार असल्याची माहिती मिळत आहे. अजून दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून लष्कराने कुलगाम जिल्ह्यातील बुचरु गावात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. गावाच्या दिशेने जात असताना संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर फायरिंग केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 

Web Title: Jammu terrorists killed in encounter with security personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.