जम्मू काश्मीरात घुसखोरी करु, चिडलेल्या चीनची भारताला धमकी

By admin | Published: April 6, 2017 02:16 PM2017-04-06T14:16:41+5:302017-04-06T14:20:44+5:30

चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणा-या अनेक वृत्तपत्रांनी भारतावर निशाणा साधत संबंध बिघडण्याची चेतावणी दिली आहे

Jammu threatens to infiltrate into Kashmir; China threatens China to India | जम्मू काश्मीरात घुसखोरी करु, चिडलेल्या चीनची भारताला धमकी

जम्मू काश्मीरात घुसखोरी करु, चिडलेल्या चीनची भारताला धमकी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-यामुळे चीन प्रचंड चिडला आहे. चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणा-या अनेक वृत्तपत्रांनी भारतावर निशाणा साधत संबंध बिघडण्याची चेतावणी दिली आहे. चीनमधील सरकारी मीडिया चायना डेली आणि ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयमधून धमकी देत भारताने जर आपली भूमिका बदलली नाही तर हल्ल्याच्या उत्तर हल्ल्याने देण्यात येईल असं म्हटलं आहे. 
 
(दलाई लामांना अरुणाचलमध्ये प्रवेश देणं भारताची मोठी चूक - चीन)
(दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड)
 
दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-यावर चायना डेलीने संपादकीय छापलं आहे. त्यानुसार "जर भारताने आपला घाणेरडा खेळ असाच सुरु ठेवला तर पेइचिंगला याचं उत्तर देण्यासाठी कोणताही विलंब करण्याची गरज नाही". तर दुसरीकडे ग्लोबल टाईम्सने काश्मीरचा उल्लेख न करता चीन काश्मीरमध्ये दखल देऊ शकतो अशी चेतावणी दिली आहे. या संपादकीयमध्ये चीनचा जीडीपी आणि लष्कर सैन्य क्षमता भारतापेक्षा जास्त असल्याची बढाई मारण्यात आली आहे. सोबतच शेजारी राष्ट्रांशी आपले चांगलं संबंध असल्याची आठवण भारताला करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय चीनला लागून असलेल्या भारतातील उत्तरेकडील राज्यांचा उल्लेख करत राजकारण करण्याचीही धमकी दिली आहे. 
 
(दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन)
 
जाणकारांचं म्हणणं आहे की दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-यात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांची उपस्थिती आणि त्यांच्या वक्तव्यामुळे चीन नाराज आहे. किरेन रिजिजू यांनी " चीनला दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा विरोध आणि भारताच्या अतंर्गत व्यवहारांमध्ये दखल देण्याची गरज नाही", असं ठणकावून सांगितलं होतं. चायना डेली आणि ग्लोबल टाईम्सच्या या लेखांना भारताविरोधातील सरकारची नाराजी म्हणून पाहिलं जात आहे. 
 
"दलाई लामा याआधीदेखील या वादग्रस्त ठिकाणी गेले आहेत. मात्र यावेळी भारताचे ज्युनिअर गृहमंत्री किरेन रिजिजू यांनी फक्त त्यांचं स्वागतच केलं नाही, तर सतत त्यांच्यासोबत होते हा फरक आहे", असं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.  भारत दलाई लामांचा वापर चीनविरोधात जशास तसे म्हणून करत असल्याचा आरोपही ग्लोबल टाईम्सने केला आहे. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमधील भारताची सदस्यता आणि पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरवरील बंदीला विरोध केल्याने भारत नाराज असून असं करत असल्याचं ग्लोबल टाईम्सने लिहिलं आहे. 
 

Web Title: Jammu threatens to infiltrate into Kashmir; China threatens China to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.