Jammu and Kashmir : बांदीपोरा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 07:30 AM2018-08-30T07:30:19+5:302018-08-30T11:41:48+5:30
जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात गुरुवारी सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. गुरुवारी ( 30 ऑगस्ट) सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलातील जवानांनी काही दहशतवाद्यांना घेराव घातला आहे.
Hajin encounter: Body of second terrorist has been recovered from the encounter site; operation continues. #JammuandKashmirhttps://t.co/LViW56ZEif
— ANI (@ANI) August 30, 2018
#UPDATE Hajin encounter: One terrorist has been killed, operation continues #JammuAndKashmirpic.twitter.com/qiWAz1fqKh
— ANI (@ANI) August 30, 2018
दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी बांदीपोराच्या हाजिन परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारदेखील केला. यावेळी जवानही दहशतवाद्यांच्या गोळीबारला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत.
#JammuAndKashmir: An encounter has started between terrorists and security forces in Bandipora's Hajin. 2-3 terrorists are reportedly trapped. More details awaited.
— ANI (@ANI) August 30, 2018
बुधवारी (29 ऑगस्ट) जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा रक्षकांनी हिजबुल या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हिजबुल संघटनेचा अल्ताफ अहमद डार उर्फ अल्ताफ कचरू आणि त्याचा साथीदार उमर राशिद या दोघांना जवानांनी ठार केले. या दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर भ्याड हल्ला केला.
जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 4 पोलीस शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावून पळ काढला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि लष्काराचे जवान दाखल झाले. जवानांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली होती.