Jammu Kashmir : श्रीनगरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 08:22 AM2018-10-17T08:22:04+5:302018-10-17T08:58:50+5:30
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत.
श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी (17 ऑक्टोबर) सकाळी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. फातेह कादल परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तसेच एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे.
Jammu & Kashmir: Three terrorists have been eliminated and one Jammu & Kashmir police personnel has lost his life: Imitiyaz Ismail Parray, SSP, Srinagar (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/fj9Jn8dTuN
— ANI (@ANI) October 17, 2018
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. श्रीनगरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
#JammuAndKashmir: Encounter underway between security forces & terrorists in Fateh Kadal area of Srinagar. More details awaited. pic.twitter.com/T8tfL5Wu55
— ANI (@ANI) October 17, 2018