जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा फडकले पाकिस्तान व इसिसचे झेंडे; पोलिसांवर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 10:08 AM2018-08-22T10:08:41+5:302018-08-22T12:20:04+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याची घटना बुधवारी घडली.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याची घटना बुधवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील जामिया मशिदीत नमाज अदा केल्यानंतर काही युवकांनी पाकिस्तान आणि अतिरेकी संघटना असलेल्या इसिस (इस्लामिक स्टेट इन इराक अॅण्ड सीरिया) चे फडकवले. यावेळी झेंडे फडकवणारे युवक आणि पोलिसांत जोरदार संघर्ष उडाला. युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
#JammuAndKashmir: People seen waving national flag of Pakistan and flag of ISIS (Islamic State in Iraq and Syria) in Srinagar. pic.twitter.com/i4STtWy49q
— ANI (@ANI) August 22, 2018
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे दाखविण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारे इसिस भारतात पाय रोवू पाहत असल्याचे भयसूचक संकेत मिळत आहेत.
#WATCH: Protesters pelt stones on a police vehicle & attack it with sticks as protests erupt in Anantnag. #JammuAndKashmir. pic.twitter.com/N5rC0Uw8qD
— ANI (@ANI) August 22, 2018
2015 साली अशा प्रकारच्या घटना जास्तवेळा घडल्या होत्या. सुरुवातीला नोव्हाटा भागात आयसिसचे झेंडे फडकावले होते. त्यानंतर श्रीनगरमध्ये अशाच घटना वारंवार घडत आहेत.
#JammuAndKashmir: Clashes break out between security forces and protesters in Srinagar. pic.twitter.com/stmdTN7pvK
— ANI (@ANI) August 22, 2018