जम्मू-काश्मीरमध्ये अजून दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या, दोन दिवसात चार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:38 AM2021-10-18T08:38:44+5:302021-10-18T08:53:04+5:30
शनिवारी दहशतवाद्यांनी बिहार आणि युपीच्या मजुराची हत्या केली होती. रविवारीदेखील घरात घुसून बिहारच्या दोन मजुरांची हत्या करण्यात आली.
श्रीनगर: काश्मीरच्या(Jammu-Kashmir) कुलगाममध्ये सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी बिगर काश्मीरी मजुरांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे, तर तिसरा गंभीर जखमी आहे. दहशतवाद्यांनी(Terrorist Attack) शनिवारी बिहार(Bihar) आणि यूपीच्या(Uttar Pradesh) व्यक्तीला गोळ्या झाडून ठार केलं होतं. रविवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील वनपोह येथे बिहारमधील मजुरांच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. (Two more non kashmiri workers shot dead in Jammu and Kashmir)
मिळालेल्या माहितीनुसार, राजा ऋषिदेव आणि जोगिंदर ऋषिदेव अशी मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत, तर चंचुन ऋषीदेव असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबाराची बातमी मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी सुरक्षा दलांने परिसराचा घेराव घालत शोध मोहीम सुरू आहे.
J&K: Two non-Kashmiri labourers, all of them being residents of Bihar, killed and one injured after being fired upon by terrorists at Wanpoh area of Kulgam. Police & Security Forces cordoned off the area.
— ANI (@ANI) October 17, 2021
Visuals from the spot.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/t7QSrKTqJz
या महिन्यात आतापर्यंत 11 बाहेरील लोक घाटीत दहशतवाद्यांचे बळी ठरले आहेत. एक दिवस अगोदरच दहशतवाद्यांनी बिहारचा रहिवासी पाणीपुरी विक्रेता अरबिंद कुमार आणि सुतार काम करणाऱ्या यूपीच्या सगीर अहमद यांची हत्या केली होती. दोन दिवसात चार बिगर काश्मिरींची हत्या केल्यानंतर काश्मीरमध्ये कामासाठी येणाऱ्या इतर राज्यातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.