जामनेर तालुका वैद्यकीय अधिकार्‍याचा धिंगाणा

By admin | Published: April 19, 2016 12:49 AM2016-04-19T00:49:15+5:302016-04-19T00:49:15+5:30

जळगाव : जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र भाऊराव राठोड यांनी सोमवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत भजे गल्लीत आरडाओरड करीत चांगलाच धिंगाणा घातला. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने जिल्हापेठ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. या प्रकारादरम्यान, पोलिसांशीदेखील हुज्जत घालत त्यांनी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Jamner Taluka Medical Officer | जामनेर तालुका वैद्यकीय अधिकार्‍याचा धिंगाणा

जामनेर तालुका वैद्यकीय अधिकार्‍याचा धिंगाणा

Next
गाव : जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र भाऊराव राठोड यांनी सोमवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत भजे गल्लीत आरडाओरड करीत चांगलाच धिंगाणा घातला. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने जिल्हापेठ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. या प्रकारादरम्यान, पोलिसांशीदेखील हुज्जत घालत त्यांनी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
प्राप्त माहितीनुसार, रवींद्र राठोड हे त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांसमवेत सोमवारी जळगावात आलेले होते. त्यांनी रात्री यथेच्छ मद्यप्राशन केले. मद्यपानानंतर त्यांनी भजे गल्लीत तेथील काही लोकांशी वाद घातला. राठोड हे जोरजोरात आरडाओरड करून शिवीगाळ करीत असल्याने तेथील काहींनी ही माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल राजू मेढे, छगन तायडे हे सहकारी कर्मचार्‍यांसोबत भजे गल्लीत दाखल झाले. त्यांनी राठोड यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांशीदेखील त्यांनी असभ्य वर्तन केले. त्यांच्या सोबत असलेल्या सहकारी कर्मचार्‍यांचेही ते ऐकून घेत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर यांच्यासमोरही त्यांनी हुज्जत घालणे सुरूच ठेवले. म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर ८५ (१) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली.
वैद्यकीय तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह...
कारवाई करण्यापूर्वी जिल्हापेठ पोलिसांनी त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यात मद्यप्राशनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.

Web Title: Jamner Taluka Medical Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.