मनसे लढविणार मोजक्या जागा ॲड.जमिल देशपांडे :सत्ताधारी व विरोधकांच्या निष्क्रियतेमुळे मनसेला संधी

By admin | Published: January 14, 2017 12:06 AM2017-01-14T00:06:27+5:302017-01-14T00:06:27+5:30

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मोजक्या जागांवर लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी दुपारी झालेल्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस ॲड.जमिल देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.

Jamshed Deshpande: MNS offers opportunities for ruling and opponents' inactivity | मनसे लढविणार मोजक्या जागा ॲड.जमिल देशपांडे :सत्ताधारी व विरोधकांच्या निष्क्रियतेमुळे मनसेला संधी

मनसे लढविणार मोजक्या जागा ॲड.जमिल देशपांडे :सत्ताधारी व विरोधकांच्या निष्क्रियतेमुळे मनसेला संधी

Next
गाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मोजक्या जागांवर लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी दुपारी झालेल्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस ॲड.जमिल देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
गेल्या वेळी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर ज्या ठिकाणी मनसे उमेदवार होते त्या ठिकाणी लक्ष्य केंद्रीत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, रावेर, यावल, अमळनेर, जळगाव तालुका, एरंडोल या ठिकाणी अनेक सक्षम उमेदवार हे मनसेच्या संपर्कात असल्याने या तालुक्यांमधून निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झाली.
राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्ष जनतेच्या, शेतकर्‍यांच्या, मजुरांच्या प्रश्नावर काम करीत नसल्याने पर्यायी पक्ष म्हणून मनसेला संधी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस ॲड. देशपांडे यांनी बैठकीत केले.
बैठकीस पाचोरा तालुकाध्यक्ष संजय पाटील, जामनेरचे विकास राजपूत, मुक्ताईनगरचे राजू सांगोळकर, प्रकाश झोपे, यावलचे चेतन अढळकर, पारोळा येथील प्रवीण पाटील, सुमित पाटील, मतीन पटेल, दिलीप सुरवाडे, रज्जाक सैयद, संदीप मांडोळे, कल्पेश पवार, किशोर नन्नवरे, प्रकाश रजवेकर, पंकज माळी, पप्पू बर्गे, विजयानंद कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Jamshed Deshpande: MNS offers opportunities for ruling and opponents' inactivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.