अरेरे! 15 वर्षीय मुलगा पडला 35 वर्षीय विवाहित महिलेच्या प्रेमात; भेटायला येताच पतीने पकडलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:02 PM2022-07-13T12:02:06+5:302022-07-13T12:03:42+5:30
दोन मुलांची आई असलेली 35 वर्षीय महिला चक्क 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरून लोक आपले ज्ञान वाढवत आहेत. मात्र, दुसरीकडे त्याचा चुकीचा वापर कुटुंब आणि समाजासाठीही घातक ठरतो. अनेकदा अशी प्रकरणे समोर येतात, ज्यामुळे कुटुंब तुटतं. अशीच एक घटना आता बिहारमधील जमुई जिल्ह्यातील एका गावातून समोर आली आहे. जिथे दोन मुलांची आई असलेली 35 वर्षीय महिला चक्क 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या जमुईमध्ये एक 35 वर्षांची महिला 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडल्याचं समोर आलं आहे. दोघांमधील प्रेम इतकं वाढलं की महिलेने हा मुलगाा आपल्या माहेरचा असल्याचा बहाणा करुन प्रियकर मुलाला घरातच थांबवलं. त्यानंतर रात्रीच्या अंधारात तिच्या पतीने महिलेला मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. यानंतर एकच गोंधळ झाला आणि गावातील मंदिरासमोर दोघांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी महिलेला आणि तिच्या 15 वर्षीय प्रियकराला पती आणि ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जमुई येथे राहणार्या 35 वर्षांच्या मुलांची आई, फेसबुक मेसेंजरवर चॅट करत असताना, जेहानाबादमध्ये राहणाऱ्या दहावीचा विद्यार्थी असलेल्या 15 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली. ही महिला मेसेंजरवर तासनतास व्हिडीओ चॅट करत असे. दरम्यान, रविवारी महिलेने या मुलाला आपल्या घरी बोलावून माहेरचा रहिवासी असल्याचे सांगून आपल्या घरात राहायला लावले. दरम्यान, रात्री उशिरा या महिलेचे मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. याच वेळी महिलेच्या पतीने दोघांना पाहिले.
गावातील मंदिरासमोर पती आणि ग्रामस्थांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला प्रियकर मुलाला आपल्या कुशीत वाचवत आहे आणि तिचा नवरा दोघांना लाठ्या-ठोक्यांनी मारहाण करत आहे. मारहाणीची बाब संपूर्ण गावासमोर दोघांच्याही निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी व घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिकांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत झाले. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.