प्लास्टिक तांदळाने जनता धास्तावली
By admin | Published: June 8, 2017 12:28 AM2017-06-08T00:28:09+5:302017-06-08T00:28:09+5:30
गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश, तेलंगणात खुल्या बाजारात प्लास्टिकच्या तांदळाची विक्री होत असल्याची जोरदार चर्चा
हैदराबाद/विशाखापट्टणम : गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश, तेलंगणात खुल्या बाजारात प्लास्टिकच्या तांदळाची विक्री होत असल्याची जोरदार चर्चा असून आता हे लोण उत्तराखंडातही पोहोचले आहे. रोजचे मुख्य अन्न असलेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील जनता मात्र धास्तावली आहे.
दोन दिवसांपूर्वी हैदराबादेतील सरूरनगरच्या एका ग्राहकाने बिर्याणीत प्लास्टिकचा तांदूळ वापरला जात असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मंगळवारी मीरपेठच्या एका ग्राहकाने असा दावा केला की, किराणा दुकानातून खरेदी केलेला तांदूळ प्लास्टिकचा निघाला. हा प्रकार सोशल मीडियावरूनही झळकल्याने या प्लास्टिकच्या तांदळाच्या चर्चेला चांगलाच ऊत आला. याची गंभीर दखल घेत राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने मीरपेठमधील किराणा दुकानावर धाड टाकून या तांदळाचे नमुने जप्त करून परीक्षणासाठी पाठविले आहेत.
>पोटदुखीसोबत हात-पायांना वेदना...
मीरपेठ भागातील नंदनवन कॉलनीतून अशोकची अशी तक्रार आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून मी आणि माझे कुटुंबिय पोटदुखीने त्रस्त आहोत. घरातील सर्वांचे हात-पायही ठणकत आहेत. सोमवारी रात्री कामावरून घरी आल्यानंतर बायकोने ताटात वाढलेला भात मोकळा आणि खाण्यालायक नव्हता.
नमुने गोळा करण्याचे आदेश...
राज्याचे नागरी पुरवठा आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी अधिकाऱ्यांनी युसूफगुडा, सरूरनगर, मीरपेठ आणि तक्रारी आलेल्या ठिकाणी तांदळाचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. हे नमुने परीक्षणासाठी राज्याच्या अन्न-पदार्थ प्रयोगशाळेत पाठविले जातील. शास्त्रीय परीक्षणानंतर नक्की काय भानगड आहे, याचा उलगडा होईल. परीक्षण अहवाल गुरुवारपर्यंत हाती घेईल, असेही त्यांनी सांगितले.