जनता परीवार स्थापन, मुलायम सिंग पहिले राष्ट्रीय अध्यक्ष
By admin | Published: April 15, 2015 04:59 PM2015-04-15T16:59:15+5:302015-04-15T17:05:24+5:30
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या लाटेला थोपवण्यासाठी अखेर सहा पक्ष एकत्र आले असून आज राजधानीत जनता परीवार स्थापन झाल्याची घोषणा
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या लाटेला थोपवण्यासाठी अखेर सहा पक्ष एकत्र आले असून आज राजधानीत जनता परीवार स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली. जनता परीवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मुलायम सिंग यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच पक्षाचे नाव, चिन्ह व झेंडा याबाबत निर्णय घेण्यात येईल असे शरद यादव यांनी सांगितले. जनता दल युनायटेड, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी जनता पार्टी, जनता दल (एस) आणि इंडियन नॅशनल लोक दल असे सहा पक्ष एकत्र आले असून ज्या ज्यावेळी हे सगळे एकत्र येतात त्यावेळी देशात सत्ता मिळतेच असे सांगत मुलायमसिंगांनी भाजपा सरकारने जनतेची केलेली फसवणूक उघड करू असे सांगितले.
मुलायम सिंग यादव, लालूप्रसाद यादव, नितिश कुमार, एच. डी देवेगौडा आदी नेत्यांनी या विलिनीकरणावर शिक्कामेर्तब केले असून देशभरात जनता परीवार पुन्हा एकदा नव्याने उभा राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.
लवकरच बिहारमध्ये निवडणुका होऊ घातल्या असून त्यामध्ये जनता परीवार एकत्रितपणे भाजपाचा सामना करेल आणि सत्ता हस्तगत करेल असा विश्वास लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला. तसेच भारतभरात जनता परीवाराचे नेते फिरतिल आणि पक्षाची बांधणी करतिल असेही ते म्हणाले.
लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणीची स्थापना करण्यात येणार असून महत्त्वाचे निर्णय सर्वसहमतीने घेतले जातील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.