जनजागर

By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:50+5:302015-05-05T01:21:50+5:30

ताण कमी होईल

Janjagar | जनजागर

जनजागर

Next
ण कमी होईल
अकरावीची एटीकेटी परीक्षा आता जून मध्येच घेण्याचा निर्णय घेऊन गोवा शालान्त मंडळाने चांगले काम केले आहे; कारण ६ महिन्यांनी परीक्षा घेण्यापेक्षा विषयाचा अभ्यास ताजा असतानाच परीक्षा घेणे विद्यार्थ्यांसाठी कमी ताणाचे आहे. तसेच राहिलेले विषय जूनमधील परीक्षेत सुटू शकले नाहीत तर त्यावर्षी त्या विद्यार्थ्याने अकरावीचे शिक्षण चालू ठेवणे हे अधिक कटकटीचे ठरेल; कारण एकाच वेळी अकरावी आणि दहावीच्या विषयांचा अभ्यास त्यांना करावा लागेल. यामुळे कोणताही अभ्यास सारखा होत नसतो. त्यापेक्षा एक वर्ष गेले तरी चालेल; परंतु व्यवस्थित अभ्यास करून तो विषय ऑक्टोबरच्या परीक्षेत व्यवस्थित सोडविणे आणि पुढच्या वर्षी अकरावीचे शिक्षण घेणे हे अधिक सोयीस्कर ठरेल.
- भावार्थ मांद्रेकर, कोरगाव, पेडणे
(फोटो एडिट लोकमतवर पाठविला आहे)

एकच संधीचा फेरविचार करावा
एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जूनमध्येच घेण्याचा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता, असो. बारावीच्या बाबतीत ही पद्धत यापूर्वीच चालू होती. लवकर परीक्षा घेण्याच्या निर्णयासाठी शालान्त मंडळाचे कौतुक व्हावे; परंतु जूनच्या परीक्षेत विद्यार्थी विषय सोडवू शकला नाही तर त्याचे वर्ष फुकट जाणार, ही चिंतेची गोष्ट आहे; कारण तेच विद्यार्थी ऑक्टोबरची परीक्षा देऊन उत्तीर्ण होणार नाही असे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे एकच संधी देण्याच्या निर्णयाबाबतीत शालान्त मंडळाने फेरविचार करावा.
पुरुषोत्तम लोलयेकर, लोलये, काणकोण
(फोटो सिस्टममध्ये सेव केला आहे)

Web Title: Janjagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.