सय्यद अहमद यांच्या घरी गेली 28 वर्ष साजरी होत आहे जन्माष्टमी
By Admin | Published: August 25, 2016 11:55 AM2016-08-25T11:55:02+5:302016-08-25T12:02:31+5:30
गांधी फोरम संघटनेचे स्थानिक अध्यक्ष डॉ. अहमद गेली 28 वर्ष आपल्या कुटुंबासोबत जन्माष्टमी साजरी करत आहेत
- ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 25 - धर्म, जाती-पातीच्या भिंती ओलांडून सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सण साजरे करणं हे फक्त आपल्याकडेच पाहायला मिळू शकतं. उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये राहणारे डॉक्टर सय्यद अहमद जातीय सलोख्याचं एक उत्तम उदाहरण आहे. गेली 28 वर्ष आपल्या कुटुंबासोबत ते जन्माष्टमी साजरी करत आहेत. मुस्लिम असूनदेखील हा सण साजरा करताना त्यांच्या मनात कोणतीच शंका येत नाही.
गांधी फोरम संघटनेचे स्थानिक अध्यक्ष डॉ. अहमद यांनी यावर्षीदेखील आपल्या घरी जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली. विशेष म्हणजे जन्माष्टमी साजरी केली जात असताना श्रीकृष्णाच्या मूर्तीची विधीवत पूजा आणि आरतीदेखील केली जाते.
'गेली अनेक वर्ष मी आणि माझं कुटुंब उत्साहात जन्माष्टमी उत्सव साजरं करतो. माणुसकीशिवाय कोणताही धर्म मोठा नाही. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बंधूभावाची भावना निर्माण व्हावी यासाठी आपण जन्माष्टमी साजरी करत असल्याचं', सय्यद अहमद यांनी सांगितलं आहे.
My whole family celebrates #Janmashtami with full fervour and spirit,doing it for past many years: Dr. S Ahmed pic.twitter.com/uFXU7jdZCv
— ANI UP (@ANINewsUP) August 25, 2016