"राधे-कृष्ण, राधे-कृष्ण..."; सचिनने सीमा हैदरला जन्माष्टमीनिमित्ताने दिलं 'हे' खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 02:42 PM2023-09-06T14:42:11+5:302023-09-06T14:42:43+5:30

सीमाने गिफ्टसोबत तिचे फोटो काढले आणि व्हिडीओही बनवला. यावेळी सीमा जन्माष्टमीचा सणही साजरा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

janmashtmi 2023 sachin meena special gift to pakistani Seema Haider | "राधे-कृष्ण, राधे-कृष्ण..."; सचिनने सीमा हैदरला जन्माष्टमीनिमित्ताने दिलं 'हे' खास गिफ्ट

"राधे-कृष्ण, राधे-कृष्ण..."; सचिनने सीमा हैदरला जन्माष्टमीनिमित्ताने दिलं 'हे' खास गिफ्ट

googlenewsNext

जन्माष्टमीच्यानिमित्ताने प्रियकर सचिन मीणाने पाकिस्तानातूनभारतात पळून आलेल्या सीमा हैदरला खास गिफ्ट दिलं आहे. सीमाने याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सचिनने जन्माष्टमीला सीमा हैदरला राधा-कृष्णाची मूर्ती भेट दिली आहे. हे गिफ्ट मिळाल्यानंतर सीमा खूपच खूश दिसत होती.

सीमाने गिफ्टसोबत तिचे फोटो काढले आणि व्हिडीओही बनवला. यावेळी सीमा जन्माष्टमीचा सणही साजरा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सीमा हैदर ही मूळची पाकिस्तानची आहे. ती चार मुलांची आई आहे. पबजी गेमच्या माध्यमातून तिची सचिनशी भेट झाली. यानंतर सीमा आपल्या मुलांसह नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आली. सध्या यूपी पोलीस तिच्याविरोधात चौकशी करत आहेत.

सीमाने सांगितलं की, तिचं सचिनवर प्रेम आहे आणि आता तिला भारतात राहायचं आहे. तिला पाकिस्तानात परत जायचे नाही. ती आता हिंदू झाल्याचंही सांगते. तिने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. सीमा भारतात आल्यापासून प्रत्येक हिंदू सण साजरा करत आहे. सीमाने सांगितले की, तिने सचिनसाठी करवा चौथ व्रतही केलं आहे. हे जोडपे सध्या खूप चर्चेत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: janmashtmi 2023 sachin meena special gift to pakistani Seema Haider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.