पॅसिफिक महासागरात जपान भारताला करणार सहकार्य

By admin | Published: February 13, 2017 04:15 PM2017-02-13T16:15:15+5:302017-02-13T16:15:15+5:30

पॅसिफिक महासागरात स्थिरता आणि शांती अबाधित ठेवण्यासाठी भारत आणि जपान एकमेकांना सहकार्य करणार आहे

Japan cooperates with India in the Pacific Ocean | पॅसिफिक महासागरात जपान भारताला करणार सहकार्य

पॅसिफिक महासागरात जपान भारताला करणार सहकार्य

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - पॅसिफिक महासागरात स्थिरता आणि शांती अबाधित ठेवण्यासाठी भारत आणि जपान एकमेकांना सहकार्य करणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली आहे. आमचा सैन्यीकरणावर विश्वास नाही. तसेच भारत आणि जपान हे दोन्ही देश शांती टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. भारत आणि जपान एकमेकांची सामायिक मूल्ये जपत असून, दोन्ही देशांसाठी ती सर्वसमावेशक आहेत. भारत पूर्व सागरात नुसतं लक्ष ठेवून नव्हे, तर कार्यरतही आहे. भारताचे सर्व भाग एकात्मिक आहेत, ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या हवाल्यानं किरण रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे.

उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत जपान कायम स्वतःची विश्वासार्हता जपत आला असल्याचं ते म्हणाले आहेत. यापुढे जपान आणि भारत पॅसिफिक महासागरात स्थैर्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

Web Title: Japan cooperates with India in the Pacific Ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.