भारतात गुंतवणूक करणारा जपान तिसरा मोठा देश - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 01:59 PM2017-09-14T13:59:28+5:302017-09-14T17:27:00+5:30
जपान भारतातला तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. व्यवसाय, उद्योगाबरोबर वातवरण बदलासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत असे मोदी म्हणाले.
अहमदाबाद, दि. 14 - भारतामध्ये जपानने 2016-17 वर्षात 4.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून, मागच्यावर्षीच्या तुलनेत ही 80 टक्के जास्त गुंतवणूक आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारपरिषदेत दिली. जपान भारतातला तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. व्यवसाय, उद्योगाबरोबर वातवरण बदलासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत असे मोदी म्हणाले.
आज दोन्ही देशांमध्ये ज्या करारांवर स्वाक्ष-या झाल्या त्याचे मी मनापासून स्वागत करतो. यामुळे भारत-जपान संबंध अधिक दृढ् होणार आहेत असे मोदी म्हणाले. मागच्यावर्षी माझ्या जपान दौ-यात अण्विक ऊर्जेचा शांततामय मार्गाने वापर करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक करार झाला असे मोदींनी सांगितले. भविष्यात भारतात राहणा-या जापानी नागरीकांची संख्या वाढणार आहे. जपानच्या अनेक कंपन्या भारताशी जोडलेल्या आहेत असे मोदी म्हणाले.
आजचा दिवस ऐतिहासिक
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारत-जपानमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे असे पंतप्रधान शिंजो अबे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळयात बोलताना म्हणाले. दहावर्षापूर्वी मला भारतीय संसदेत भाषणाची संधी मिळाली होती अशी आठवण अबेनीं यावेळी सांगितली. जगातील अन्य कुठल्याही द्विपक्षीयसंबंधांपेक्षा भारत आणि जपानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि समृद्ध आहेत असे अबे म्हणाले.
शक्तीशाली जपान भारताच्या तर, शक्तीशाली भारतामध्ये जपानचे हित आहे असे मोदी म्हणाले. दुस-या महायुद्धानंतर जपानची वाताहात झाली होती. पण 1964 साली जपानमध्ये बुलेट ट्रेनचा आरंभ झाला आणि ख-या अर्थाने विकासाची सुरुवात झाली. नव्या जपानचा पूर्नजन्म झाला असे शिंजो अबे म्हणाले. बुलेट ट्रेनमुळे अनेक शहरे जवळ आली आणि कंपन्यांना व्यवसाय वाढीसाठी फायदा झाला असे अबेंनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी यावेळी आपल्या भाषणाने सर्वांची मनं जिकलं. उपस्थितांना नमस्कार करत शिंजो आबे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी आबे यांनी 'जय जपान, जय इंडिया'चा नारा दिला व भविष्यातही भारताला मदत करण्याचं आश्वासन दिले.
'जय जपान, जय इंडिया'
नमस्काराने भाषणाची सुरुवात, धन्यवादानं शेवट
शिंजो आबे यांनी नमस्कार म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला. दोन्ही देशांतील मैत्रीची ही नवीन सुरुवात आहे. जपानचे 100 हून अधिक इंजिनिअर या प्रकल्पासाठी भारतात आलेत. या प्रकल्पावर त्यांचे कार्य सुरू आहे. मोदींचं बुलेट ट्रेनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जपान आणि भारताचे इंजिनिअर दिवस-रात्र मेहनत करतील. या इंजिनिअर्संनी निश्चय केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही,
'जय जपान, जय इंडिया'चा नारा
आबे यांनी भारत आणि जपानच्या मैत्रीला एक उत्तम उदाहरण सांगत एक नवीन नारा देखील दिला. ते म्हणाले की, जपानचा 'ज' आणि इंडियाचा 'आय' हे अक्षरं मिळून जय शब्द तयार होते म्हणजे विजय होते. 'जय जपान, जय इंडिया'ला साकार करण्यासाठी दोन्ही एकत्र मिळून काम करतील
I urge Japanese business community to open maximum number of Japanese restaurant chains in India: PM Narendra Modi pic.twitter.com/pT98G2cWeK
— ANI (@ANI) September 14, 2017