जाट आंदोलनामुळे ५५0 रेल्वे गाड्यांवर परिणाम

By admin | Published: February 19, 2016 07:34 PM2016-02-19T19:34:24+5:302016-02-19T19:51:15+5:30

आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून या आंदोलनामुळे रेल्लेच्या सेवेवर मोठा परिणाम झाला.

Jat agitation resulted in 550 trains | जाट आंदोलनामुळे ५५0 रेल्वे गाड्यांवर परिणाम

जाट आंदोलनामुळे ५५0 रेल्वे गाड्यांवर परिणाम

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून या आंदोलनामुळे रेल्लेच्या सेवेवर मोठा परिणाम झाला. 
हरियाणामधील रोहतकमध्ये जाट समाजाच्या आरक्षणावरुन तणाव वाढत चालला असून आरक्षणाच्या मागणीवरुन  आंदोलकांनी रेल्वे महामार्गावर चक्का जाम केले. यामुळे  दिल्ली, हरियणा, राजस्थान, पंजाब आणि जम्मूकडे जाणा-या रेल्वेवर परिणाम झाला असून एकूण ५५० रेल्वेवर परिणाम झाला असल्याची माहिती रेल्वेचे अधिकारी अनिल सक्सेना यांनी दिली. 
याचबरोबर अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण आले. या आंदोलकांनी निदर्शनादरम्यान पोलिसांवरदेखील हल्ला चढविला. यात पोलिसांच्या गाड्या जाळल्याचाही प्रकार घडला. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी केलेल्या गोळीबारात २ जण ठार तर नऊ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनात रेल्वे गाड्या बंद झाल्याने इतर प्रवाशांनीही सहभाग घेत येथील जेवणाचा आनंद घेतला. 

Web Title: Jat agitation resulted in 550 trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.