अखेर जावेद अख्तर यांनी घेतले 'ते' शब्द मागे
By Admin | Published: March 3, 2017 12:31 PM2017-03-03T12:31:27+5:302017-03-03T15:54:13+5:30
गुरमेहर कौर विवादात मत मांडणाऱ्या वीरेंद्र सेहवाग व योगेश्वर दत्तच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर टीका करणा-या जावेद अख्तरनी आपले कठोर शब्द मागे घेतले आहेत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - गुरमेहर कौर विवादात आपले मत मांडणाऱ्या वीरेंद्र सेहवाग आणि योगेश्वर दत्त यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर टीका करणारे प्रसिद्ध गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी अखेर आपले शब्द मागे घेतले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अख्तर यांनी ही घोषणा करत स्पष्टीकरणही दिले आहे. ' वीरेंद्र सेहवाद हा महान खेळाडू आहे, यात काही वादच नाही. आणि आपण केलेली पोस्ट हा एक गमतीचा भाग होता व त्यात गुरमेहरेविरोधी काही नव्हते असे त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच मी माझे कठोर शब्द मागे घेतो' असे ट्विट अख्तर यांनी केले.
तसेच गुरमेहर कौरच्या बाजूने बोलणारा क्रिकेटपटू गौतम गंभीरचे त्यांनी कौतुकही केले आहे. 'कोणत्याही ट्रोलिंगची वा उजव्या विचारसरणीवाद्यांची भीती न बाळगता गुरमेहरच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकाराच्या समर्थन करणा-या गौतम गंभीरबद्दल मला आदर वाटतो' असेही अख्तर यांनी म्हटले आहे.
Since Sehwag undoubtedly a great player has clarified he was just being facetious n is not anti Gurmehar I take back my rather harsh words.
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 2, 2017
My respect for Gautam Gambhir who with out any fear of trolls n right wing extremists has stood for Gurmehar 's freedom of expression.Bravo
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 2, 2017
So many war veterans and retired army officers have supported Gurmehar's statement but perhaps they are not "nationalist " enough for some
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 2, 2017
वीरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्त आणि गीता फोगाट यांनी गुरमेहर कौरच्या मताविरोधात टीप्पणी केल्याने जावेद अख्तर यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांच्या कमी शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. अडखळत धडपडत शिककेल्या लोकांची गोष्ट वेगळी आहे, पण सुशिक्षित लोकांना काय ढाले आहे, असा प्रश्न जावेद अख्तर यांनी या सर्वांवर टीका करताना केला होता. त्यावर कुस्तीपटू बबिता फोगटने टीका करत ' देशभक्ती पुस्तकातून येत नाही' असे प्रत्युत्तर दिले होते. तर ' जावेद अख्तरजी तुम्ही कविता, गोष्टी रचल्या असतील तर आम्हीसुद्धा छोटे छोटे पराक्रम करून देशाचे नाव जगात नेले आहे' असा टोला योगेश्वर दत्त यानेही अख्तर यांना लगावला होता.
या सर्व प्रकरणानंतर गदारोळ सुरू झाला असता सेहवागनेही स्पष्टीकरण दिले होते. ' आपण फक्त विनोद म्हणून ते ट्विट केलं होतं, कोणाचीही थट्टा करण्याच्या हेतूने नव्हतं', असा खुलासा केला आहे. 'सहमत किंवा असमहत असणं हा मुद्दाच नव्हता. तिला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तिला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देणारे समाजातील अत्यंत खालच्या स्तरातील आहेत. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ती गुरमेहर कौर असो अथवा फोगट भगिनी', असे सेहवागने स्पष्ट केले.