लाज आणली; मुस्लिम डॉक्टरांना प्राधान्य देणाऱ्या रुग्णालयाचा जावेद अख्तर यांच्याकडून समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 09:01 PM2019-06-10T21:01:13+5:302019-06-10T21:06:11+5:30

जावेद अख्तर यांची रुग्णालयावर सडकून टीका

javed akhtar slams hospital which advertisement goes viral on social media | लाज आणली; मुस्लिम डॉक्टरांना प्राधान्य देणाऱ्या रुग्णालयाचा जावेद अख्तर यांच्याकडून समाचार

लाज आणली; मुस्लिम डॉक्टरांना प्राधान्य देणाऱ्या रुग्णालयाचा जावेद अख्तर यांच्याकडून समाचार

Next

तिरुअनंतपुरम: मुस्लिम डॉक्टरांना प्राधान्य अशी जाहिरात देणाऱ्या रुग्णालयाचा गीतकार जावेद अख्तर यांनी समाचार घेतला. मुस्लिम अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल, अशी जाहिरात एका रुग्णालयानं दिली होती. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. रुग्णालयानं दिलेली जाहिरात लज्जास्पद असल्याचं जावेद अख्तर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. 

'केरळमधील रुग्णालयाची कृती लज्जास्पद आहे. ही माणसं कोणत्या तोंडानं आणि नैतिकतेनं धर्मनिरपेक्षता आणि न्यायाची मागणी करतात. अशा प्रकारच्या जाहिरातींनी कोणत्याही नियमांचं किंवा कायद्याचं उल्लंघन कसं होतं नाही याचं मला आश्चर्य वाटतं. कायदेतज्ज्ञांनी याबद्दल विचार करुन अशा कट्टरवाद्यांना न्यायालयात खेचायला हवं,' अशा शब्दांमध्ये अख्तर यांनी रुग्णालयाच्या जाहिरातीवर सडकून टीका केली. 



सोशल मीडियावर व्हायरल झालेली जाहिरात ओशिरा कोल्लमच्या स्टार रुग्णालयाची आहे. या जाहिरातीच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जावेद अख्तर यांच्या ट्विटवरदेखील अनेकांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. जावेद अख्तर याआधीही अनेक सामाजिक विषयांवर निर्भीडपणे व्यक्त झाले आहेत. 

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास जावेद अख्तर त्यांची पत्नी शबाना आझमीसोबत देश सोडून जाणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत होतं. सोशल मीडियावर याबद्दल मोठी चर्चा झाली. मात्र आपण असं कोणतंही विधान केलं नसल्याचं स्पष्टीकरण अख्तर यांनी दिलं. शबाना आझमी यांनीदेखील या वृत्ताचं खंडन केलं होतं.
 

Web Title: javed akhtar slams hospital which advertisement goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.