ड्युटीवर असताना जवान झाला HIV बाधित; १ कोटी ५४ लाखांच्या भरपाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:35 AM2023-09-28T10:35:07+5:302023-09-28T10:35:17+5:30
१ कोटी ५४ लाखांच्या भरपाईचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ड्युटीवर असताना जवान आजारी पडल्यानंतर रक्त चढवण्यात आले. मात्र यात जवानाला एचआयव्हीची लागण झाली. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाला जबाबदार धरत निवृत्त हवाई दलाच्या सैनिकाला १ कोटी ५४ लाख ७३ हजार रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. निवृत्त सैनिकाने यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती.
२०१४ तपासणीदरम्यान ते एचआयव्हीबाधित असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ३१ मे २०१६ रोजी त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले. यानंतर जवानाने २०१७मध्ये नुकसानभरपाईची मागणी केली.
कोर्टाने काय म्हटले?
कोर्टाने म्हटले की, लोक देशभक्तीच्या भावनेने लष्करात येतात. देशासाठी प्राण पणाला लावायला तयार असतात. अशा स्थितीत त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे. मात्र, या प्रकरणात सैनिकाला आदराने वागवले गेले नाही.