निपाणीतील बेनाडी येथील जवान सागर बने शहीद, आज अंत्यसंस्कार; पंजाबमध्ये लष्करी तळावर बेछूट गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 12:31 PM2023-04-13T12:31:56+5:302023-04-13T12:46:50+5:30

2018 साली रायचूर येथे झालेल्या सैन्य भरतीत त्यांनी यश मिळवून सैन्यात प्रवेश मिळवला होता.

Jawan Sagar bane of Benadi in Nipani martyred in firing at Bathinda, cremated today | निपाणीतील बेनाडी येथील जवान सागर बने शहीद, आज अंत्यसंस्कार; पंजाबमध्ये लष्करी तळावर बेछूट गोळीबार

निपाणीतील बेनाडी येथील जवान सागर बने शहीद, आज अंत्यसंस्कार; पंजाबमध्ये लष्करी तळावर बेछूट गोळीबार

googlenewsNext

निपाणी : तालुक्यातील बेनाडी येथील व सध्या पंजाब येथील भटिंडा येथे सेवेत असलेले लष्करी जवान सागर आप्पासाहेब बने (वय 25) यांचा सेवा बजावताना झालेल्या गोळीबारात शहीद झाले. गुरुवारी सागर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात करण्यात येणार असून या घटनेने बेनाडी सह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सागर हे बेनाडी येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण बेनाडी येथीलच शाळेत झाले होते. त्यानंतर निपाणी येथील एका खाजगी संस्थेत त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 2018 साली रायचूर येथे झालेल्या सैन्य भरतीत त्यांनी यश मिळवून सैन्यात प्रवेश मिळवला होता.

सध्या पंजाब येथे नियुक्ती असताना बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात सागर हे शहीद झाले. त्यांची निधनाची माहिती मिळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. गुरुवारी त्यांचे पार्थिव गावी येणार असून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Jawan Sagar bane of Benadi in Nipani martyred in firing at Bathinda, cremated today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.