अंतर्वस्त्रांवर द्यावी लागली जवानांना परीक्षा सेनेच्या मुख्यालयाने घेतली गंभीर दखल
By admin | Published: March 2, 2016 02:21 AM2016-03-02T02:21:45+5:302016-03-02T02:21:45+5:30
नवी दिल्ली : कॉपीसारखे प्रकार टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केवळ अंतर्वस्त्र घालून परीक्षेला बसू देण्याचा प्रकार बिहारमधील सेनेच्या जवानांच्या भरतीदरम्यान घडला. या प्रकाराची सेनेच्या मुख्यालयाने गंभीर दखल घेतली आहे.
Next
न ी दिल्ली : कॉपीसारखे प्रकार टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केवळ अंतर्वस्त्र घालून परीक्षेला बसू देण्याचा प्रकार बिहारमधील सेनेच्या जवानांच्या भरतीदरम्यान घडला. या प्रकाराची सेनेच्या मुख्यालयाने गंभीर दखल घेतली आहे.रविवारी मुजफ्फरपूर येथे जवळपास ११०० विद्यार्थ्यांना कपडे काढून केवळ अंतर्वस्त्रावर परीक्षा देण्यास भाग पाडले. हे विद्यार्थी शारीरिक चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. स्थानिक निरीक्षकांनी हा निर्णय घेतला होता, असे सेनेच्या सूत्रांनी सांगितले. परीक्षेच्यावेळी सेलफोन तसेच कपड्यात लपविलेल्या ब्ल्यू टूथचा सर्रास वापर झाल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकाराची दखल घेत सेनेत भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक मिळणार नाही आणि निष्पक्ष परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी स्थानिक कार्यालयाने स्वीकारावी, अशी कडक सूचना केली आहे.(वृत्तसंस्था)