जवानांचे फोन हॅक; दिली पाकला माहिती, गुजरातमध्ये हेरगिरी करणारा ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 05:46 AM2023-10-21T05:46:15+5:302023-10-21T05:46:33+5:30

जुलैमध्ये अधिकाऱ्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेद्वारे चालविले जाणारे नापाक ऑपरेशन कळले होते.

Jawan's phone hacked; Information given to Pakistan, spy arrested in Gujarat | जवानांचे फोन हॅक; दिली पाकला माहिती, गुजरातमध्ये हेरगिरी करणारा ताब्यात

जवानांचे फोन हॅक; दिली पाकला माहिती, गुजरातमध्ये हेरगिरी करणारा ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदाबाद : गुजरात एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली लाभशंकर माहेश्वरी या ५३ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. एटीएसने लष्करी आणि हवाई दलाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली. 

यावर्षी जुलैमध्ये अधिकाऱ्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेद्वारे चालविले जाणारे नापाक ऑपरेशन कळले होते. यात व्हॉट्सॲप नंबरद्वारे जवानांना १५ ऑगस्टपूर्वी त्यांच्या अँड्रॉइड मोबाइल हँडसेटमध्ये ‘हर घर तिरंगा अभियान’ नावाने ‘एपीके’ अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले होते. 

आरोपीने शाळेचा अधिकारी असल्याचे दाखवून लोकांना आपल्या मुलासोबत राष्ट्रध्वजाचे छायाचित्र अपलोड करण्यास सांगणारा संदेशही पाठविला होता. ज्यांची मुले आर्मी स्कूल किंवा डिफेन्स स्कूलमध्ये शिकतात, त्यांनाही हा संदेश त्याने पाठविला होता.  

अशी चोरली माहिती...
आरोपीच्या मोबाइलच्या तपासणीत हा व्हॉट्सॲप नंबर पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे लोक वापरत असल्याचे समोर आले आहे.
याद्वारे ते लष्कराच्या कर्मचाऱ्यांचे मोबाइल हॅक करून त्यांच्या मोबाइलवरून गुप्तचर माहिती मिळवत होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने एपीएसची (आर्मी पब्लिक स्कूल) वेबसाइट किंवा अँड्रॉइड ॲप्लिकेशन ‘डिजिकॅम्प्स’ याचा वापर फी जमा करण्यासाठी केला जातो, याद्वारेही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संबंधित माहिती मिळविली, असे समोर आले आहे.

मूल होत नव्हते, म्हणून आला भारतात अन्...
nआरोपी लाभशंकर माहेश्वरी हा मूळचा पाकिस्तानी हिंदू असून, त्याला मूल होत नव्हते. त्यामुळे तो १९९९ मध्ये उपचारासाठी आपल्या पत्नीसह भारतात आला होता.
n सुरूवातीला तो तारापूर येथे त्याच्या सासरच्या घरी राहात होता. नंतर हळूहळू त्याने अनेक दुकाने उघडत मोठा व्यवसाय सुरू केला. त्याला २००६ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते.

आई-वडिलांना भेटायला गेला अन् झाला ब्रेनवॉश
२०२२ च्या सुरूवातीला आरोपी आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. तेथे त्याचे ब्रेनवॉश करण्यात आले. तेव्हापासून तो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता. व्हॉट्सॲप अकाऊंट केल्यानंतर त्याने सीमकार्ड पाकिस्तानला पाठविले आणि त्याबदल्यात पैसे मिळवले.

Web Title: Jawan's phone hacked; Information given to Pakistan, spy arrested in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.