जवानांनी उधळला लष्करी तळावर घुसण्याचा प्रयत्न, ३ अतिरेक्यांचा खात्मा
By admin | Published: October 6, 2016 07:32 AM2016-10-06T07:32:04+5:302016-10-06T10:45:37+5:30
लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा अतिरेक्यांनी लष्करी तळावर हल्ला केला.
Next
ऑनलाइन लोकमत
हंडवारा, दि. ६ - बारामुल्ला येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा अतिरेक्यांनी लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील लंगेट येथील ३० राष्ट्रीय रायफल्सच्या तळाजवळ अतिरेक्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन अतिरेकी ठार झाले.
अतिरेक्यांचा लष्करी तळामध्ये घुसण्याचा प्रयत्न सर्तक जवानांनी हाणून पाडला. लष्कराने परिसराला घेराव घातला असून शोधमोहिम सुरु आहे. सकाळी पाचच्या सुमारास अतिरेक्यांनी गोळीबार करताच जवानांनी लगेच प्रत्युत्तर दिले अशी माहिती लष्करी अधिका-यांनी दिली.
जवळपास तासाभर गोळीबार सुरु होता. तळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्यांना सुरक्षाकडे भेदता आले नाही. अद्यापपर्यंत कुठल्या जिवीतहानीचे वृत्त नाही. रविवारी रात्री अतिरेक्यांनी बारामुल्ला येथील लष्करी तळाजवळ केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला.
#WATCH: (Visuals deferred) Terrorists open fire outside an Army camp in Langate in Handwara (J&K). 3 terrorists gunned down; op continues. pic.twitter.com/kko2Nk9CMM
— ANI (@ANI_news) October 6, 2016
भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून उरी दहशतवादी हल्ल्याचा हिशेब चुकता केल्यानंतर पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांच्या कारवायात मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे तर, अतिरेकी काश्मीरमध्ये लष्करी तळांना लक्ष्य करत आहेत.
#SpotVisuals (visuals deferred) Firing resumed outside an Army camp in Langate in Handwara (J&K) after a 15 mins stand off pic.twitter.com/EYOIn4I03C
— ANI (@ANI_news) October 6, 2016