अमिताभ यांचे नाव जोडल्यामुळे जया बच्चन पुन्हा संतापल्या; धनखड म्हणाले- 'तुम्ही नाव बदला'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 07:55 PM2024-08-05T19:55:32+5:302024-08-05T19:56:03+5:30
यापूर्वीही स्वतःच्या नावासोबत पती अमिताभ यांचे नाव जोडल्यामुळे जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली होती.
Rajya Sabha : ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांचे नाव आपल्या नावाला जोडल्यामुळे संतापल्या. सोमवारी(दि.5) राज्यसभेत कामकाज सुरू असताना सभापती जगदीप धनखड यांनी 'जय अमिताभ बच्चन' असे नाव पुकारले, जया यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी सभापतीदेखील थोडे चिडले. मात्र, नंतर जया बच्चन यांनी सभापतींची माफी मागितली.
सविस्तर माहिती अशी की, सोमवारी वरच्या सभागृहातील कामकाजादरम्यान सभापतींनी पुरवणी क्रमांक-4, जया अमिताभ बच्चन असे नाव पुकारले. हे ऐकून सपा खासदार संतापल्या आणि जागेवर उभे राहून सभापतींना म्हणाल्या- सर, तुम्हाला अमिताभचा अर्थ माहित आहे. त्यावर सभापती म्हणाले- मॅडम, कृपया तुम्ही नाव बदलून घ्या.
Itna gussa kis baat ka rehta hai Jaya Amitabh Bacchan ko pic.twitter.com/zk2qllNIbj
— Sajcasm (@sajcasm_) August 5, 2024
सभापती पुढे म्हणतात, सन्माननीय सदस्य, जे नाव निवडणूक प्रमाणपत्रात छापून आलेले असते, त्यात बदल करण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा फायदा मी 1989 मध्ये घेतला होता. नाव बदलाची ही प्रक्रिया आम्ही प्रत्येक सदस्याला सांगितली आहे.
तुम्ही लोकांनी हे नाटक सुरू केले: जया बच्चन
सभापतींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जया बच्चन म्हणतात, सर मला माझ्या पतीच्या नावाचा आणि त्यांचा कामाचा अभिमान आहे. मी खूप आनंदी आहे की, तुम्ही लोकांनी हे नाटक सुरू केले आहे.
संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे
यावर सभापती त्यांच्या फ्रान्स दौऱ्याचा उल्लेख करतात. ते म्हणाले, मी एकदा फ्रान्सला गेलो होतो. तिथल्या एका हॉटेलमध्ये मॅनेजमेंटने मला सांगितलं की, तिथे प्रत्येक ग्लोबल आयकॉनचे फोटो आहेत. मी पायऱ्या चढून गेलो आणि पाहिले की, तिथे अमिताभ बच्चन यांचा फोटो आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. या सर्व गोंधळानंतर जया बच्चन यांनी सभापतींची माफी मागितली.
संबंधित बातमी वाचा - 'मी जया अमिताभ बच्चन...', पूर्ण नाव घेताच जगदीप धनखड हसले; सभागृहात पिकला एकच हशा