जया बच्चन, विजय दर्डा, तेंडुलकर संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समितीवर नामनियुक्त
By admin | Published: September 12, 2015 04:43 AM2015-09-12T04:43:50+5:302015-09-12T04:43:50+5:30
प्रख्यात अभिनेत्री जया बच्चन, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य २८ खासदारांना
नवी दिल्ली : प्रख्यात अभिनेत्री जया बच्चन, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य २८ खासदारांना २०१५-१६ या वर्षासाठी माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीवर नामनियुक्त करण्यात आले आहे.
ही समिती सूचना व प्रसारण मंत्रालय, दूरसंचार मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कामगिरीची समीक्षा करेल आणि धोरणात्मक बदल सुचवेल. या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अनुराग
ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या स्थायी समितीवर नामनियुक्त करण्यात आलेल्या राज्यसभेच्या इतर सदस्यांमध्ये जावेद अख्तर,
सलीम अंसारी, मेघराज जैन, सन्तियूस
कुजूर, डेरेक ओब्रायन, डॉ. के. व्ही.
पी. रामचंद्र राव आणि महंत शंभूप्रसादजी तुंदिया यांचा समावेश आहे.
तर स्थायी समितीवर नामनियुक्त करण्यात आलेल्या लोकसभा सदस्यांमध्ये लालकृष्ण आडवाणी, प्रसुन बॅनर्जी, डॉ. सुनील गायकवाड, हेमंत गोडसे, डॉ. अनुपम हाजरा,
डॉ. जयकुमार जयवर्धन,
पी. करुणाकरन, वीरेंद्र कश्यप, हरिंदरसिंग खालसा, हेमामालिनी, केशवप्रसाद मौर्य, मेहबुबा मुफ्ती, डॉ. के. सी. पटेल, रावसाहेब दानवे पाटील, परेश रावल, डॉ. भारतीबेन सियाल, अभिषेक सिंग, डी. के. सुरेश, रामदास तडस आणि आर. वनरोजा यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)