‘मैत्री’ सुरू करणाऱ्या जया वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डाच्या प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 08:05 AM2023-09-01T08:05:42+5:302023-09-01T08:05:54+5:30
१ सप्टेंबरपासून त्या पदाची सूत्रे हाती घेणार असून, मंत्रिमंडळ नियुक्ती समितीनेही त्यास मान्यता दिल्याचे रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयआरटीएस अधिकारी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली. रेल्वे बोर्डाची धुरा सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
१ सप्टेंबरपासून त्या पदाची सूत्रे हाती घेणार असून, मंत्रिमंडळ नियुक्ती समितीनेही त्यास मान्यता दिल्याचे रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. १९८८च्या बॅचच्या इंडियन रेल्वे ट्राफिक सेवेच्या अधिकारी असलेल्या जया वर्मा सिन्हा या अनिलकुमार लाहोटी यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. सिन्हा सध्या बोर्डाच्या सदस्या असून अध्यक्षपदी त्या ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत कार्यरत राहणार असल्याचे म्हटले आहे.
कोण आहेत जया वर्मा ?
बालासोर रेल्वे दुर्घटनेवेळी जया वर्मा सिन्हा यांनीच सिग्नल यंत्रणेबाबत स्पष्टीकरण दिले होते. त्या अलाहाबाद विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी भारत-बांगलादेश मैत्री एक्स्प्रेसची सुरुवात केली होती.