जयललिता रुग्णालयातच
By admin | Published: September 25, 2016 03:05 AM2016-09-25T03:05:26+5:302016-09-25T03:05:26+5:30
ताप आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार
चेन्नई : ताप आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जयललिता यांना डायबेटिस आणि मुत्रपिंडाचा आजार असल्याने त्यांना उपचारासाठी विमानाने सिंगापूरला नेण्यात येणार असल्याचे वृत्त तामिळनाडूमध्ये पसरले होते. मात्र अण्णा द्रमुकने हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.
अपोलो हॉस्पिटलचे मुख्य अधिकारी सुबय्या विश्वनाथन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत. त्या सामान्य भोजन घेत आहेत. पक्षाचे प्रवक्ते सी. आर. सरस्वती यांनी सांगितले की, कोणीतरी जयललिता यांच्याविषयी जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवित आहे. जयललिता यांना लवकर बरे वाटावे म्हणून अभिनेते रजनीकांत यांनी प्रार्थना केली. राज्यात समर्थक
अनेक ठिकाणी पूजा, प्रार्थना करत आहेत. (वृत्तसंस्था)