हमीनंतरच जयललितांना जामीन

By admin | Published: October 18, 2014 12:05 AM2014-10-18T00:05:02+5:302014-10-18T00:05:02+5:30

भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही अनुचित कृत्य न करण्याचे आवाहन स्वत: जयललिता कार्यकत्र्यांना करतील, अशी हमी दिल्यानंतरच सवरैच्च न्यायालयाने जयललिता यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

Jayalalithaa bail after surety | हमीनंतरच जयललितांना जामीन

हमीनंतरच जयललितांना जामीन

Next
नवी दिल्ली : एकदाही सुनावणी तहकुबीची विनंती न करता अपील शीघ्रगतीने निकाली निघण्यासाठी आम्ही सर्व सहकार्य करू. तसेच भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही अनुचित कृत्य न करण्याचे आवाहन स्वत: जयललिता कार्यकत्र्यांना करतील, अशी हमी दिल्यानंतरच सवरैच्च न्यायालयाने जयललिता यांना अंतरिम जामीन मंजूर केला. 
ज्या प्रकरणी जयललिता यांना ही शिक्षा झाली आहे त्याची मूळ फिर्याद भाजपाचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली होती. ज्या न्यायाधीशांनी मूळ शिक्षा ठोठावली व नंतर जामीन नाकारला ते कन्नडिग आहेत म्हणून जयललिता समर्थकांनी त्यांचे पुतळे जाळले, त्यांच्या निषेधाने फलक लावले आणि व्यंगचित्रे काढून त्यांची टिंगल केली. मनात आणले असते तर जयललिता एका शब्दाने न्यायव्यवस्थेची ही विटंबना थांबवू शकल्या असत्या. पण त्यांनी तसे केले नाही, असे स्वामी यांनी निदर्शनास आणले. 
यावर नरिमन यांनी झाले ते अयोग्य होते, अशी कबुली दिली आणि आता जयललिता स्वत: कार्यकत्र्याना असले काही न करण्याचे आवाहन करतील, असे त्यांनी आश्वासन          दिले.
शिक्षेला स्थगिती देण्याचा आग्रह धरताना जयललितांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन म्हणाले की, खालच्या न्यायालयाने दिलेल्या ठराविक मुदतीच्या शिक्षेविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात जेव्हा अपील केले जाते तेव्हा सर्वसाधारणपणो शिक्षेला स्थगिती दिली जाते. अपिलाचा निकाल होईर्पयत आरोपीने शिक्षेचा बहुतांश काळ तुरुंगात काढला आणि अंतिमत: तो निदरेष ठरला तर त्याचे अपील व्यर्थ ठरू नये हा यामागचा विचार असतो.
सरन्यायाधीश न्या. दत्तू म्हणाले की, जयललिता यांच्यावरील खटला संपायला 18 वर्षे लागली. आता आम्ही शिक्षेला स्थगिती दिली तर उच्च न्यायालयातील अपील 2क् वर्षे निकाली निघणार नाही. यावर नरिमन यांनी जयललिता यांच्यावतीने अशी हमी दिली की, यावर जयललिता व इतर आरोपींनी अपिलाच्या सर्व कागदपत्रंची पूर्तता दोन महिन्यांत करावी. 
18 डिसेंबर रोजी आम्ही पुन्हा आढावा घेऊ व तशी पूर्तता झाली असल्याची खात्री पटली तर उच्च न्यायालयास अपील तीन महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश देऊ, असे सांगून खंडपीठाने जयललिता यांना अंतरिम जामीन दिला.
 शिक्षा स्थगित केली तर जयललिता घराच्या बाहेरही न पडण्याची हमी द्यायला तयार आहेत, असे नरिमन म्हणाले. पण न्यायमूर्ती म्हणाले की, कोणालाही घरकैदेत ठेवण्याचा आदेश आम्ही देऊ शकत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
लुंगी डान्स.. सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर शुक्रवारी राज्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. मदुराई येथे जयललिता यांच्या चाहत्यांनी आनंदात ‘लुंगी डान्स’वर असा ठेका पकडला.

 

Web Title: Jayalalithaa bail after surety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.