जयललितांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

By admin | Published: May 24, 2016 04:43 AM2016-05-24T04:43:12+5:302016-05-24T04:43:12+5:30

अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी सोमवारी एका वर्षाच्या आत दुसऱ्यांदा एकाच तारखेला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण केली. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या

Jayalalithaa sworn in as chief minister for a second time | जयललितांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

जयललितांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

Next

चेन्नई : अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी सोमवारी एका वर्षाच्या आत दुसऱ्यांदा एकाच तारखेला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण केली. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपात कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर जयललिता यांनी एक वर्षाआधी २३ मे २०१५ रोजी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. गेल्या १६ मे रोजी पार
पडलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर ६८ वर्षीय जयललिता यांनी एक वर्षानंतर सोमवारी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण केली. अण्णाद्रमुकने विधानसभेच्या १३४ जागा जिंकल्या आहेत. जयललिता यांच्यासोबत त्यांच्या २८ मंत्र्यांनीही पद व गोपनीयतेची शपथ ग्रहण केली. राज्यपाल के. रोसय्या यांनी त्यांना शपथ दिली. जयललितांनी आपल्या पूर्वीच्या मंत्रिमंडळातील १५ मंत्र्यांना या नव्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे तर १३ मंत्री नवे आहेत.

Web Title: Jayalalithaa sworn in as chief minister for a second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.