जयललिता शुक्रवारी जनतेसमोर येणार
By admin | Published: May 20, 2015 02:20 AM2015-05-20T02:20:30+5:302015-05-20T02:20:30+5:30
उच्च न्यायालयाने आरोपमुक्त केल्यानंतर अण्णाद्रमुक सुप्रिमो जे. जयललिता यांचे येत्या शुक्रवारी येथील पक्ष आमदारांच्या बैठकीच्या निमित्ताने प्रथमच सार्वजनिक दर्शन घडणार आहे.
Next
चेन्नई : बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपमुक्त केल्यानंतर अण्णाद्रमुक सुप्रिमो जे. जयललिता यांचे येत्या शुक्रवारी येथील पक्ष आमदारांच्या बैठकीच्या निमित्ताने प्रथमच सार्वजनिक दर्शन घडणार आहे.
मंगळवारी पक्ष पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. २२ मे रोजी ६७ वर्षीय जयललिता पक्ष संस्थापक एमजी रामचंद्र, माजी मुख्यमंत्री सीएन अण्णादुराई आणि थोर पुढारी ईव्ही रामास्वामी यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करतील. याचदिवशी पक्ष आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत जयललितांची पक्षाच्या विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड होऊ शकते. (वृत्तसंस्था)