शशिकलांनी रचला जयललितांच्या मृत्यूचा कट

By admin | Published: June 12, 2017 12:03 AM2017-06-12T00:03:00+5:302017-06-12T00:03:00+5:30

दीपक व शशिकला यांनी जयललिता यांच्या ‘मृत्यूचा कट’ रचल्याचा आरोप तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी केला.

Jayalalithaa's death cut | शशिकलांनी रचला जयललितांच्या मृत्यूचा कट

शशिकलांनी रचला जयललितांच्या मृत्यूचा कट

Next

चेन्नई : दीपक व शशिकला यांनी जयललिता यांच्या ‘मृत्यूचा कट’ रचल्याचा आरोप तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी केला. जयललितांच्या पोझ गार्डन निवासस्थानी रविवारी सुरक्षारक्षकांनी मला धक्काबुक्की केल्याचे व परिसरात प्रवेश करू दिला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘‘मी पोझ गार्डनला गेले ते माझा भाऊ दीपक याने बोलावल्यावरून’’, असा दावा करून दीपा जयकुमार यांनी आरोप केला की दीपकने अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या (अम्मा) प्रमुख शशिकला व त्यांचे निकटवर्ती टीटीव्ही दिनकरन यांच्याशी ‘आजची घटना’ घडवून आणण्यासाठी हातमिळवणी केली. या घटनांनंतर त्या भागात तणाव निर्माण झाला व पोलिसांनी सुरक्षा वाढवली. स्वत: दीपकने मला अनेक फोन करून बोलावून घेतले. येथे येण्याचे माझे आज काहीही ठरलेले नव्हते परंतु त्याने मला जयललितांच्या छायाचित्राला पुष्पहार घालण्यास बोलावले, असे दीपा जयकुमार म्हणाल्या. दीपा यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप अ.भा.अ. द्रमुकच्या (अम्मा) सूत्रांनी फेटाळला. दीपा या काहीही न ठरवता आल्या व त्यांना भव्य पोझ गार्डनच्या समोरच्या भागात असलेल्या जयललिता यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालायचा होता, असेही ते म्हणाले. प्रारंभी दीपा यांनी पुष्पहार घातला व त्यानंतर त्यांना घरात प्रवेश करायचा होता त्याला मात्र परवानगी नाकारली, असे सूत्र म्हणाले. मला कोणी धक्काबुक्की केली त्याला मी ओळखू शकते, असे दीपा जयकुमार म्हणाल्या. दीपा जयकुमार म्हणाल्या की, निवासस्थानी दूरचित्रवाणी कॅमेरामनही होते त्यांच्यावरही सुरक्षारक्षकांनी हल्ले केले. आजच्या घटनेबद्दल त्यांनी दीपक यांना सतत दोष दिला व मी तो आणि शशिकला यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Jayalalithaa's death cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.