शिक्षेविरोधात जयललितांचे हायकोर्टात अपील

By admin | Published: September 29, 2014 11:58 AM2014-09-29T11:58:58+5:302014-09-29T12:17:26+5:30

एका भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी ठरलेल्या व चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले आहे.

Jayalalitha's appeal in the High Court against the punishment | शिक्षेविरोधात जयललितांचे हायकोर्टात अपील

शिक्षेविरोधात जयललितांचे हायकोर्टात अपील

Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २९ - १६ वर्षांपूर्वीच्या एका भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी ठरलेल्या व  चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले आहे. 
जयललिता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून शिक्षेविरोधात दाद मागितली आहे तसेच जामिनासाठी अर्जही केला आहे. ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी हे उच्च न्यायालात जयललिता यांची बाजू मांडणार असल्याचे समजते. 
बंगळुरू विशेष न्यायालयाने शनिवारी अण्णा द्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवत त्यांना ४ वर्षे तुरुंगावासाची तसेच १०० कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यामुले जयललिता यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले असून अण्णा द्रमुकच्या ओ. पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 
जयललिता यांना शिक्षा सुनावताच त्याचे तीव्र पडसाद तामिळनाडूत उमटले व अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक व बस पेटविणे असे प्रकार घडले. द्रमुक नेते एम. करुणानिधी व हे प्रकरण लावून धरणारे भाजपाचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे पुतळे संतप्त जमावाने जाळले. 

Web Title: Jayalalitha's appeal in the High Court against the punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.