निवडणूक कागदपत्रांवर जयललितांचा डावा अंगठा
By admin | Published: October 30, 2016 02:05 AM2016-10-30T02:05:45+5:302016-10-30T02:05:45+5:30
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या उजव्या हाताला सूज आल्यामुळे तिरुपरनकुंदरम पोटनिवडणुकीतील पक्ष उमेदवाराच्या
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या उजव्या हाताला सूज आल्यामुळे
तिरुपरनकुंदरम पोटनिवडणुकीतील पक्ष उमेदवाराच्या कागदपत्रांवर त्यांनी डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा दिला आहे. जयललितांवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जयललिता यांनी फॉर्म ए आणि बी मध्ये पक्षाचे उमेदवार ए. के. बोस यांना अद्रमुकचे अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता देणे कायद्याने बंधनकारक असल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेण्यात आला.
स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीवर अलीकडेच ट्रॅकियोटॉमी (श्वसननलिका) उपचार करण्यात आले असून, त्यांच्या उजव्या हाताला सूज आली आहे. त्यामुळे तूर्तास त्या स्वाक्षरी करण्यास असमर्थ आहेत, असे संबंधित दस्तावेजात म्हटले आहे. हा दस्तावेज मद्रास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजीव गांधी सरकारी सामान्य रुग्णालयातील प्रोफेसर डॉ. पी. बालाजी यांनी साक्षांकित केला आहे. (वृत्तसंस्था)