जयललितांच्या भाचीचा राजकारणात प्रवेश

By admin | Published: February 14, 2017 10:08 PM2017-02-14T22:08:36+5:302017-02-14T22:11:55+5:30

जयललितांची भाची दीपा जयकुमार यांनी आज राजकारणात प्रवेश केला आहे.

Jayalalitha's niece's entry into politics | जयललितांच्या भाचीचा राजकारणात प्रवेश

जयललितांच्या भाचीचा राजकारणात प्रवेश

Next

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 14 - जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी पनीरसेल्वम आणि शशिकला असे दोन गट पडले आहेत. जयललितांची भाची दीपा जयकुमार यांनी आज राजकारणात प्रवेश केला आहे. प्रभारी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यासोबत दीपा जयकुमार यांनी चेनन्नईतील मरीन बीचवर जाऊन जयललीतांच्या स्मृतीला अभिवादन करत राजकारण प्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

जयललितांच्या भावाची मुलगी असलेल्या दीपा यांचे शिक्षण लंडनमध्ये झाले असून, जयललिता यांच्यावर उपचार सुरू असताना आपल्याला जयललिता यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप केल्यावर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. तसेच जयललितांच्या अंत्ययात्रेतही आपल्याला जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. 42 वर्षीय दीपा यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तामिळनाडूत लागत असलेल्या त्यांच्या पोस्टरमध्ये त्यांच्या चेहऱ्याची ठेवण जयललितांच्या चेहऱ्याशी मिळताजुळता ठेवण्याची काळजी घेतली जात आहे. तसेच चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित त्या जयललिता यांच्यासारख्याच साड्या परिधान करत आहेत. 

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दोषी ठरवत त्यांना चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर काही तासातच शशिकला यांनी अण्णा द्रमुक पक्षातून मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह 20 नेत्यांची हकालपट्टी केली.

दरम्यान, पनीरसेल्वम यांनी सर्व आमदारांना मतभेद बाजूला ठेऊ, पक्ष एकसंध ठेवण्यासाठी एकत्र काम करु आणि अम्माची सत्ता कायम राखू असे आमदारांना आवाहन केले आहे. अम्माची धोरणे, योजना यापुढे कायम सुरु राहतील. कायदा-सुव्यवस्था राखणे आमची जबाबदारी आहे. मला पाठिंबा देणा-या सर्व नेते, कार्यकर्ते, तरुणांचे मी आभारी आहे असे पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. 5 फेब्रुवारीला शशिकलाची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पनीरसेल्वम यांनी बंडाचे निशाण फडकावले.

 

 

Web Title: Jayalalitha's niece's entry into politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.