कर्जबुडव्यांना शिक्षा ठोठावणार- सरकारचा इशारा जयंत सिन्हा यांची माहिती: तपास संस्था कामाला लागल्या
By admin | Published: March 14, 2016 12:20 AM2016-03-14T00:20:18+5:302016-03-14T00:20:18+5:30
नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.
Next
न ी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.जागतिक मंदीमुळे झालेले व्यावसायिक नुकसान पाहता कर्ज फेडताना गल्लत केली जाऊ नये. सहेतूक कर्ज बुडवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाईलच, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. काही लोक खरोखरच बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतले असून मुद्दाम कर्ज बुडवले जाते. अशा लोकांसाठी कठोर कायदा अवलंबला जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जावी यासाठी तपास संस्था कामाला लागल्या आहेत, असे ते पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.त्यांनी २ मार्च रोजी देशातून पसार झालेल्या मल्ल्या यांचा मात्र थेट उल्लेख केला नाही. बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडविल्याप्रकरणी सवार्ेच्च न्यायालयाकडून सुनावणी होण्याच्या काही दिवस आधीच ते लंडनला गेल्याचे मानले जाते.(वृत्तसंस्था)-----------------------मंदीमुळेही उद्योग डबघाईस.....जागतिक मंदी किंवा यापूर्वीच्या सरकारच्या धोरणात्मक अपयशामुळे जागतिक मंदीचा तडाखा झेलू न शकणाऱ्या कंपन्याही कर्जबाजारी बनल्या आहेत. कर्ज बुडविणाऱ्या अशा कंपन्यांचा वेगळा संच आहे. अनुत्पादक कर्जाबाबत (एनपीए) धोरणात्मक हस्तक्षेप करीत योग्य तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले. चुकीच्या आर्थिक डावपेचांमुळे किंवा बाह्य घटकांमुळे व्यवसाय मोडकळीस येत असेल तर त्यात बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे काहीही नाही. व्यावसायिक समस्या उद्भवणाऱ्या कंपन्यांना अशा प्रकारच्या समस्या येऊ नये, असे सरकारला वाटते. त्यामुळे सरकार ओळख पटविण्याचे काम करेल. भविष्यात उद्योगावर नादारीची वेळ येऊ नये यासाठी संरचनात्मक मुद्यांकडे सरकार लक्ष घालेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.--------------------------------मल्ल्यांविरुद्ध अजामीनपात्र वारंट...जीएमआर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीचा ५० लाख रुपयांचा धनादेश न वटल्याबद्दल समन्स बजावूनही मल्ल्या यांनी न्यायालयात हजेरी न लावल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हैदराबादच्या न्यायालयाने अजामीनपात्र वारंट बजावला आहे. मल्ल्या यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्याचे ठरविले आहे. सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे अध्यक्ष असलेल्या मल्ल्या यांच्याविरुद्ध १४ व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १० मार्च रोजी अजामीनपात्र वारंट जारी केला. त्यांनी या प्रकरणी १३ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.------------------------मल्ल्यांचे पुन्हा टिष्ट्वट ...कर्ज बुडविल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मल्ल्या यांनी ब्रिटनमध्ये मीडिया माझ्यामागे हात धुवून लागल्याचा आरोप पुन्हा अज्ञात स्थळाहून टिष्ट्वट पाठवत केला आहे. त्यांनी नेमके ठिकाण बघितलेले नाही, ही दु:खाची बाब आहे. मी मीडियाशी बोलून माझा वेळ आणि प्रयत्न वाया घालविणार नाही, असेही ते म्हणाले. काही टिष्ट्वटस्सोबत मल्ल्या यांनी टिष्ट्वटरवर संदेशांचा सपाटाच लावला आहे. त्यांनी विमान वाहतूक, क्रीडा आणि मद्य कंपन्यांमधील समस्याही मांडल्या आहेत. टिष्ट्वटचा मला कंटाळा आला असून लोकांना ते कळत नाही, असे त्यांचे पुत्र सिद्धार्थ मल्ल्या यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले.