जैश-ए-मोहम्मद भाजपाचं पिल्लू, कपिल सिब्बल यांचा सनसनाटी आरोप
By Admin | Published: October 7, 2016 02:51 PM2016-10-07T14:51:06+5:302016-10-07T14:51:06+5:30
भाजपा एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं म्हणत कपिल सिब्बल यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन आरोप - प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत खून की दलाली करत असल्याचा आरोप केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत दलाली हा शब्द काँग्रेसला लागू पडतो. तो शब्द त्यांनी आपल्यापर्यंतच ठेवावा. आम्हाला तो शब्द जोडू नये अशा समाचार घेतला. यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत ज्यांच्या विरोधात हत्येचे गुन्हे आहेत ते आम्हाला शिकवणार, भाजपा एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं म्हणत कपिल सिब्बल यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर आरोपांच्या फैरी झाडल्या. जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केलं असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला. मसूद अजहरला भाजपाने सोडलं, आणि तिकडे जाऊन त्याने जैश-ए-मोहम्मद तयार केला, आणि आमच्यावर आरोप करता असा सवाल कपिल सिब्बल यांनी विचारला.
पाकिस्तान काय आहे माहित असतानाही तिकडे जाऊन वाढदिवस साजरा करण्याची काय गरज होती. एका बाजूने मैत्री करता आणि दुसरीकडे आमच्यावर आरोप करता असं कपिल सिब्बल बोलले आहेत. पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला असं म्हणणं लष्कराचा अपमान आहे, त्यांची माफी मागायला हवी. लष्कराच्या यशस्वी कामगिरीवर राजकारण करणं बंद करा, पोस्टरबाजी बंद करा असंही कपिल सिब्बल बोलले आहेत.
अटलबिहारी वाजपेयी ज्यांना दुर्गा म्हणायचे त्या इंदिरा गांधींमध्ये दोष होता का ? राजीव गांधींमध्ये दोष होता का ? असे सवाल कपिल सिब्बल यांनी विचारले. बेजबाबदार वक्तव्य होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: निवेदन द्यावे, पण फायदा उचलायचा असल्याने तेदेखील मजबूर आहेत असा टोला कपिल सिब्बल यांनी लगावला.
पाकिस्तान एक पेशंट आहे, तो चांगला राहावा अशी भारताची इच्छा आहे. आज त्या पेशंटला दहशतवादाचा कॅन्सर झाला आहे. आपल्याला केमिओथेरपी देण्याची गरज आहे, जे संरक्षण दल देत आहे. हा कॅन्सर संपवण्यासाठी आम्ही मोदींसोबत आहोत, कॅन्सर बरा व्हावा आणि दोघांनी एकत्र नांदावे असं आम्हाला वाटतं. पण सर्जिकल स्ट्राईकनंतर हा कॅन्सर संपला, आपण जिंकलो असं यांना वाटत आहे. पण एका सर्जिकल स्ट्राईकने कॅन्सर संपत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
पत्रकार परिषदेतील मुद्दे -
- ज्यांच्या विरोधात हत्येचे गुन्हे आहेत ते आम्हाला शिकवणार, भाजपा एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं
- अटलबिहारी वाजपेयी ज्यांना दुर्गा म्हणायचे त्या इंदिरा गांधींमध्ये दोष होता ? राजीव गांधींमध्ये दोष होता ?
- नरेंद्र मोदी यांनी स्वत: निवेदन द्यावे, पण तेदेखील मजबूर आहेत कारण फायदा उचलायचा आहे
- कारगिलमध्ये नियंत्रण रेषा ओलांडली गेली नव्हती का
- आम्ही कधीच लष्कराच्या कारवाईचं राजकारण केलं नाही
- पाकिस्तान एक पेशंट आहे, तो चांगला राहावा अशी भारताची इच्छा आहे
- आज त्या पेशंटला दहशतवादाचा कॅन्सर झाला आहे, आपल्याला केमिओथेरपी देण्याची गरज आहे, जे संरक्षण दल देत आहे
- हा कॅन्सर संपवण्यासाठी आम्ही मोदींसोबत आहोत, कॅन्सर बरा व्हावा आणि एकत्र नांदावे असं आम्हाला वाटतं
- सर्जिकल स्ट्राईकनंतर हा कॅन्सर संपला, आपण जिंकलो असं यांना वाटत आहे, एका सर्जिकल स्ट्राईकने कॅन्सर संपत नाही
- पोस्टरबाजी बंद करा, लष्कराच्या यशस्वी कामगिरीवर राजकारण करणं बंद करा
- जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केलं, मसूद अजहरला भाजपाने सोडलं, आणि आमच्यावर आरोप करता
- पाकिस्तान काय आहे माहित असतानाही तिकडे जाऊन वाढदिवस साजरा करण्याची काय गरज होती
- एका बाजूने मैत्री करता आणि दुसरीकडे आमच्यावर आरोप करता
- पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला असं म्हणणं लष्कराचा अपमान आहे, त्यांची माफी मागायला हवी