‘जैश’चे दोन अतिरेकी चकमकीत ठार, जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:15 AM2017-12-20T01:15:16+5:302017-12-20T01:15:32+5:30
जैश-ए-मोहम्मदचे दोन अतिरेकी सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री चकमकीत ठार मारले. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत गोळी लागून महिलाही मरण पावली.
श्रीनगर : जैश-ए-मोहम्मदचे दोन अतिरेकी सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री चकमकीत ठार मारले. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत गोळी लागून महिलाही मरण पावली.
मारले गेलेले अतिरेकी अलीकडेच जम्मू आणि काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर झालेल्या हल्ल्यासह अनेक कारवायांत सहभागी होते. कॅश व्हॅनवरील हल्ल्यात दोन सुरक्षारक्षक मारले गेले होते. शोपियानच्या वनीपोरा भागात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला व चकमक उडाली. दोन अतिरेकी मारले गेले तर तिसरा पळून गेला, असे पोलीस अधिकाºयाने सांगितले. या चकमकीत लष्कराचा जवान व पोलीस कर्मचारी जखमी
झाला. (वृत्तसंस्था)
काश्मीर खोºयात गेल्या आठवड्यात पडलेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे गुरेझ आणि नौगाम सेक्टर्समधील नियंत्रण रेषेवर बेपत्ता झालेल्या पाच जवानांपैकी तिघांचे मृतदेह सोमवारी शोध आणि बचाव पथकाच्या हाती लागले. दोन मृतदेह गुरेझ सेक्टरमध्ये तर एका जवानाचा मृतदेह नौगाम सेक्टरमध्ये सापडला.
१२ डिसेंबर रोजी झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीनंतर नौगाम (जिल्हा कुपवाडा) सेक्टरमध्ये दोन जवान घसरून पडले होते, तर गुरेझच्या (जिल्हा बांदीपोरा) कंझलवान उपविभागात तीन जवान बेपत्ता झाले होते.