ट्रेनमध्ये अंडर गारमेंट्सवर फिरणाऱ्या आमदाराचा 'दिल्ली वाली गर्लफ्रेंड' गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 12:11 PM2022-02-04T12:11:55+5:302022-02-04T12:12:51+5:30

पाटणा ते राजधानी दिल्ली या तेजस ट्रेनच्या प्रवासादरम्यान आमदार गोपाल मंडल हे अंडर गारमेंट्सवरच प्रवास करताना दिसून आले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

JDU MLA Gopal Mandal dance on delhi wali girlfriend song video viral | ट्रेनमध्ये अंडर गारमेंट्सवर फिरणाऱ्या आमदाराचा 'दिल्ली वाली गर्लफ्रेंड' गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा VIDEO

ट्रेनमध्ये अंडर गारमेंट्सवर फिरणाऱ्या आमदाराचा 'दिल्ली वाली गर्लफ्रेंड' गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा VIDEO

Next

बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू)च्या एका आमदाराच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये, आमदार महाशय रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'दिल्ली वाली गर्लफ्रेंड' गाण्यावर जबरदस्त ठुमके मारताना दिसत आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका लग्न समारंभाचा असल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, भागलपूर जिल्ह्यातील गोपालपूर विधानसभा मतदारसंघातील JD(U) आमदार गोपाल मंडल कुर्ता आणि पायजम्यावर दिसत आहेत. त्याच्या डोक्यावर टोपी आणि गळ्यात मफलर आहे. ते एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत समर्थकही मंचावर नाचताना दिसत आहेत. यापूर्वीही गोपाल मंडल यांचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा ते एका बार डान्सरसोबत थिरकताना दिसत होते. 

याशिवाय, पाटणा ते राजधानी दिल्ली या तेजस ट्रेनच्या प्रवासादरम्यान आमदार गोपाल मंडल हे अंडर गारमेंट्सवरच प्रवास करताना दिसून आले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावर बराच गदारोळ झाल्यानंतर तेव्हा आपले पोट ठीक नव्हते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. याशिवाय, मे 2021 मध्ये, जेव्हा कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती, तेव्हा गाडीने कंटेनमेंट झोनचे बॅरिकेडिंग तोडतल्याचाही त्यांचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता.

Web Title: JDU MLA Gopal Mandal dance on delhi wali girlfriend song video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.