जेडीयूकडून भव्य मटण पार्टीचे आयोजन; अचानक शहरातील हजारो कुत्रे गायब, भाजपचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 06:19 PM2023-05-17T18:19:08+5:302023-05-17T18:20:27+5:30
जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पाटणा: काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये जेडीयूच्या वतीने बिर्याणी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बिहारच्या मुंगेरमध्ये आयोजित या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने लोक मटणावर ताव मारुन गेले. या कार्यक्रमावरुन आता राजकारण सुरू झाले आहे. भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी दावा केला आहे की, त्या आयोजनानंतर शहरातील कुत्रे गायब झाले आहेत. त्या कार्यक्रमात कोणत्या प्राण्यांचे मांस देण्यात आले, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंगेर में JDU के मटन पार्टी के बाद शहर से हजारों कुत्ते गायब,मीट कम हो जाने पर कुत्ता मार कर खिलाया गया .. विजय सिन्हा, बीजेपी नेता।#Biharpic.twitter.com/6OlsprevMX
— Mukesh singh (@Mukesh_Journo) May 16, 2023
विजय सिन्हा म्हणाले की, हे प्रकरण खूप गंभीर आहे. जेडीयूच्या मटण पार्टीत हजारो लोकांना कोणत्या जनावरांचे मांस खाऊ घालण्यात आले, याची चौकशी व्हायला हवी. यामुळे मोठा आजार पसरू शखतो. मुंगेरमधून हजारो कुत्रे बेपत्ता झाल्याची नोंद आहे. याशिवाय, त्या कार्यक्रमात दारू दिली गेली का, याचीही चौकशी व्हायला हवी.
जेडीयू नेते लालन सिंह यांचा कार्यक्रम
जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी मुंगेरमध्ये या मेजवानीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात लोकांना मटण आणि भात खायला देण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक पोहोचले होते. गर्दी एवढी वाढली की, लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी लाठ्याचाही वापर करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, आता भाजपकडून या मेजवानीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.