जदयूचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात

By admin | Published: May 7, 2014 08:44 AM2014-05-07T08:44:47+5:302014-05-07T09:02:46+5:30

बिहारमधील सत्तारूढ जनता दल (युनायटेड)चे ५०हून अधिक आमदार भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) संपर्कात असल्याचा दावा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.

JDU's 50 MLAs are in touch with the BJP | जदयूचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात

जदयूचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात

Next

पाटणा : बिहारमधील सत्तारूढ जनता दल (युनायटेड)चे ५०हून अधिक आमदार भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) संपर्कात असल्याचा दावा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. हे सर्व आमदार मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचेही मोदींनी म्हटले आहे़ सरकार पाडण्याच्या राजकारणावर भाजपाचा विश्वास नाही़ पण नितीश कुमार यांचे सरकार त्यांच्याच पक्षातील मतभेदातून पडेल़ जदयूच्या ११६पैकी ५०हून अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत़ भाजपासोबतची आघाडी तोडण्याच्या निर्णयामुळे हे आमदार दुखावले आहेत आणि लालूप्रसाद त्यांना कुठल्याही स्थितीत नको आहेत़ म्हणूनच ते भाजपाच्या संपर्कात आहेत़ लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या विजयासाठीही या आमदारांनी मदत केली, असे मोदी मंगळवारी म्हणाले़

Web Title: JDU's 50 MLAs are in touch with the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.