महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला; IIT- JEE परीक्षेचा निकाल जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 01:36 PM2019-06-14T13:36:57+5:302019-06-14T13:45:47+5:30
देशभरातून या परीक्षेसाठी 1 लाख 61 हजार 319 विद्यार्थी बसले होते. यापैकी 38 हजार 705 विद्यार्थी पात्र ठरले.
नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(IIT) मार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड (JEE Advance 2019) या प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालात महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. याआधीही कार्तिकेय गुप्ता याने 100 पर्सेटाइल गुण घेत देशातील पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते. कार्तिकेय याने यावर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करत 93.70 टक्के गुण मिळविले होते.
देशभरातून या परीक्षेसाठी 1 लाख 61 हजार 319 विद्यार्थी बसले होते. यापैकी 38 हजार 705 विद्यार्थी पात्र ठरले. कार्तिकेयला 372 पैकी 346 गुण मिळवत देशात पहिला नंबर पटकावला आहे. तर दुसऱ्या नंबरवर तेलंगणातील शबानम सहाय हिने 372 पैकी 308 गुण मिळविले आहेत.
अशाप्रकारे पाहा (JEE Advanced Results 2019) परीक्षेचा निकाल -
- विद्यार्थ्यांनी सर्वात आधी जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत वेबसाइटवर www.jeeadv.ac.in जावं
- JEE Advanced च्या होमपेजवर जाऊन JEE Advanced Result 2019 च्या लिंकवर क्लिक करा
- लिंक ओपन झाल्यानंतर त्याठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि विचारलेली माहिती नीट भरावी
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा निकाल (JEE Advanced Result 2019) होमस्क्रीनवर दिसेल
- याठिकाणाहून विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढू शकतात.