JEE Advanced Exam date 2021: जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा ३ जुलैला; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा
By कुणाल गवाणकर | Published: January 7, 2021 06:58 PM2021-01-07T18:58:45+5:302021-01-07T19:03:31+5:30
JEE Advanced Exam date 2021: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची महत्त्वाची घोषणा
JEE Advanced Exam date 2021: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. निशंक यांनी वेबिनारच्या माध्यमातून आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक असलेली पात्रता आणि नियमांचीदेखील माहिती दिली. ३ जुलै २०२१ रोजी जेईई ऍडव्हान्स्डची परीक्षा होणार आहे.
#JEEAdvanced 2021 will be conducted on 3rd July 2021. The exam will be conducted by IIT Kharagpur: Minister of Education Ramesh Pokhriyal Nishank pic.twitter.com/ifsmGj9PEL
— ANI (@ANI) January 7, 2021
'जेईई मेन्सच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केल्यानंतर अनेक जण जेईई ऍडव्हान्स्डच्या परीक्षा कधी होणार, कुठे होणार याची विचारणा करत होते. गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचं संकट आहे आणि त्यातून आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मदत होईल. प्रतिभावान विद्यार्थ्यांना संधी मिळेल,' असं निशंक वेबिनारमध्ये म्हणाले.
जेईई ऍडव्हान्स परीक्षा अतिशय महत्त्वाची असते याची तुम्हाला कल्पना आहे. ३ जुलै २०२१ रोजी ही परीक्षा होईल. तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी बराच वेळ शिल्लक आहे. तुम्ही व्यवस्थितपणे परीक्षेची तयारी करा. यंदा आयआयटी खरगपूर या परीक्षेचं आयोजन करेल, अशी माहिती निशंक यांनी दिली.