१२वीत ७५ टक्के गुण, तरच देता येईल जेईई, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आव्हान देणारी याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 05:45 AM2023-05-30T05:45:29+5:302023-05-30T05:45:47+5:30
ही स्थिती पूर्वीही होती, मग आम्ही हस्तक्षेप का करावा?, असा सवाल खंडपीठाने यावेळी केला.
नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) प्रवेशासाठी आवश्यक जेईई परीक्षेसाठी बारावीच्या परीक्षेत (उच्च माध्यमिक) ७५ टक्के गुण असणे आवश्यक असल्याच्या निकषाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळून लावली. ‘ही स्थिती पूर्वीही होती व या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आपली इच्छा नाही’, असे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी म्हटले. या शिक्षणाशी संबंधित बाबी आहेत, हा मुद्दा तज्ज्ञांवर सोडला पाहिजे. ही स्थिती पूर्वीही होती, मग आम्ही हस्तक्षेप का करावा?, असा सवाल खंडपीठाने यावेळी केला.
चंदन कुमार आणि इतरांनी या प्रवेशासाठी बारावीच्या बोर्ड परीक्षेत ७५% गुणांच्या पात्रता निकषांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की कोविडच्या काळात सूट दिली होती.