JEE Main Result 2019: जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, अंकित मिश्रा महाराष्ट्रातून पहिला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 11:45 PM2019-04-29T23:45:45+5:302019-04-29T23:48:29+5:30
नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून (एनटीए) आज संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य(जेईई-मेन) चा निकाल घोषित करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून (एनटीए) आज संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य(जेईई-मेन) चा निकाल घोषित करण्यात आला आहे. हा निकाल jeemain.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. या परीक्षेसाठी जवळपास 11 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. जेईई मेन 2019 या परीक्षा 8, 9, 10 आणि 12 एप्रिल रोजी घेण्यात आली होती.
ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेनची एप्रिलमध्ये परीक्षा दिली होती. त्या विद्यार्थ्यांना निकाल जाणून घेण्यासाठी वरिल वेबसाइटवर आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारीख टाकून लॉगइन करून आपला निकाल पाहू शकतात. तर जेईई मेन ही परीक्षा वर्षातून २ वेळा आयोजित केली जाते. या वर्षातील पहिली परीक्षा जानेवारीमध्ये तर दुसरी परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आली.