'जीवन में लालू हैं, कण-कण में लालू हैं,' विरहाने व्याकूळ राबडीदेवींनी रचली कविता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:14 PM2019-04-05T17:14:44+5:302019-04-05T17:18:33+5:30
कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या त्यांच्या पत्नी राबडी देवी यांनी आपल्या मनातील व्यथा कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे.
पाटणा - बिहारच्या राजकारणाचे केंद्र मानले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव सध्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे गेल्या चार दशकांनंतर प्रथमच बिहारमधील निवडणुकीच्या प्रचारामध्ये लालूप्रसाद यादव यांचा सहभाग दिसणार नाही. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या त्यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी आपल्या मनातील व्यथा कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे.
एकीकडे लालूप्रसाद यादव हे कारावासाची शिक्षा भोगत आहेत. तर दुसरीकडे लालूंच्या दोन्हीं मुलांमध्ये पक्षातील वर्चस्वावरून लढाई सुरू झाली आहे. लालूंचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यांनी धाकट्या भावाविरोधात विरोधाचा बिगुल फुंकला आहे. त्यामुळे राबडीदेवी व्यथित झाल्या आहेत. कौटुंबिक कलहाच्या वेळी लालूंच्या अनुपस्थितीमुळे दु:खी झालेल्या राबडी देवी यांनी 'जीवन में लालू हैं, कण-कण में लालू हैं,' अशा आशयाची कविता रचली आहे.
नैना थोड़े हैं नम
— Rabri Devi (@RabriDeviRJD) April 4, 2019
दिल में है ज़रा सा ग़म
पर हिम्मत न टूटी
न हुआ है हौसला कम
बड़बोले पापी को
लाएंगे ज़मीन पर हम
इस साज़िश का बदला
बदलाव से लेंगे हम
कोई कैसे करेगा जुदा
कोई कैसे करेगा जुदा
जीवन में लालू है
जन जन में लालू है
कण कण में लालू है
हर मन में लालू है pic.twitter.com/KS7Rvd2TqS
लालूप्रसाद आणि राबडीदेवींचा थोरला मुलगा तेजप्रताप यादव यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत लालू राबडी मोर्चा उघडण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी तेजस्वी यादव यांनाही अल्टिमेटम दिले आहे. दरम्यान, तेजप्रताप यादव यांचे त्यांच्या पत्नीशी मतभेद असून, त्यांनी घटस्फोटासाठीही अर्ज दाखल केला होता. तसेच सासरे चंद्रिका राय यांना सारण येथून उमेदवारी देण्यात आल्यानेही तेजप्रताप यादव प्रचंड नाराज झाले आहेत.