जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 04:33 PM2024-11-22T16:33:55+5:302024-11-22T16:34:21+5:30

काही लोक अनेक अडचणी आल्या तरी परिस्थितीला धीराने तोंड देतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे.

jehanabad handicapped aslam working as delivery boy passion to crack bpsc exam know his inspiring story | जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

फोटो - zeenews

काही लोक अनेक अडचणी आल्या तरी परिस्थितीला धीराने तोंड देतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. दिव्यांग असलेला अस्लम आई-वडिलांच्या निधनानंतर सरकारकडून मिळालेल्या ट्रायसायकलचा वापर करून आपल्या धैर्याने आणि मेहनतीने काम करत आहे. कोणावर अवलंबून न राहता एका खासगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय बनून आपली स्वप्नं साकार करण्याचा प्रयत्न करत आहे. 

जहानाबाद शहरातील शेखालमचक परिसरातील हा दिव्यांग तरुण घरोघरी जाऊन एका खासगी कंपनीकडून आलेल्या सामानाची डिलिव्हरी करतो. या डिलिव्हरीतून मिळालेल्या पैशातून तो केवळ आपला उदरनिर्वाहच करत नाही तर BPSC ची तयारी करण्यासाठी साहित्य देखील खरेदी करतो. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. 

दिव्यांग अस्लमने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आई सैरुन निशा यांचा मृत्यू झाला. तर वडील फजल करीम यांचं आधीच निधन झालं होतं. लहानपणी पॅरालिसीसमुळे दोन्ही पायांनी अपंगत्व आलं. कोरोनाच्या काळात आणखी एक धक्कादायक घटना घडली. याच दरम्यान त्यांचा अपघात झाला ज्यामुळे त्याला आता चालता येत नाही.

अशा परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने घरोघरी वस्तू पोहोचवण्यास सुरुवात केली. हे काम करतानाही अनेक अडचणी येतात पण धैर्याने तोंड देतो. दिव्यांग असल्यामुळे अनेक वस्तूंची डिलिव्हरी करण्यात अडचण येते आणि काही लोकांची वृत्ती आणि वागणूकही वेगळी असते असंही अस्लमने म्हटलं आहे. 
 

Web Title: jehanabad handicapped aslam working as delivery boy passion to crack bpsc exam know his inspiring story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.