गुजरात बोर्डाच्या नववीच्या पुस्तकात येशूचा उल्लेख "हैवान"

By admin | Published: June 22, 2017 02:15 PM2017-06-22T14:15:56+5:302017-06-22T14:15:56+5:30

गुजरातच्या शालेय पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता नववीच्या हिंदीच्या पुस्तकात येशू ख्रिस्तांचा उल्लेख "हैवान" असा करण्यात आला आहे.

Jesus mentions in the book Naveen of Gujarat Board "Havan" | गुजरात बोर्डाच्या नववीच्या पुस्तकात येशूचा उल्लेख "हैवान"

गुजरात बोर्डाच्या नववीच्या पुस्तकात येशूचा उल्लेख "हैवान"

Next

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. 22- गुजरातच्या शालेय पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता नववीच्या हिंदीच्या पुस्तकात येशू ख्रिस्तांचा उल्लेख "हैवान" असा करण्यात आला आहे. 8 जून रोजी ही चूक तेथील लोकांच्या लक्षात आली . चूक लक्षात आल्यानंतर ती सुधारण्यासाठी तात्काळ पुस्तक मागे घ्यायला सांगण्यात आलं आहे. पुस्तकं मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा गुजरातच्या ख्रिस्ती समुदायाने पाठ्यपुस्तक मंडळाला दिला आहे.
 
या संदर्भात युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राईट्स या संघटनेच्या 6 सदस्यांचं शिष्टमंडळ बुधवारी पाठ्पुस्तक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन पेठानी यांना भेटलं होतं. आर्चबिशप थॉमस मॅकवॉन यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं.
"१३ जूनला मंडळाला एक निवेदन देऊन आम्ही झाल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागायला सांगितली होती. प्रकाशित साहित्यामुळे ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. १० दिवसांच्या आत हे पाठ्यपुस्तक मागे घ्या आणि नवी पुस्तकं आणा, अशी मागणी आम्ही केली आहे. " वाक्यात ज्या संदर्भात "हैवान" शब्द येतो ती वाक्यही चुकीची आहेत . ज्या कर्मचाऱ्यांनी प्रूफ रिडींग केलं आहे आणि ज्यांच्यामुळे चूक झाली आहे, त्यांच्याविरोधात कारवाई करा, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती फोरमचे प्रवक्ते विनायक जाधव यांनी दिली आहे. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. 
 
"शिक्षण-परीक्षण मासिकाच्या पुढील अंकात या चुकीबद्दल खेद व्यक्त करण्यात येईल. आम्ही फोरमला अहवालही दाखवला, ज्यानुसार, प्रकाशित साहित्यात "हैवान" ऐवजी "भगवान" हा शब्दप्रयोग असेल. तसंच या पुस्तकाच्या डीटीपी ऑपरेटरला कामावरून हटविण्यात आलं आहे," असं पेठानी यांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: Jesus mentions in the book Naveen of Gujarat Board "Havan"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.