विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या शिक्षिकेने विकले दागिने
By admin | Published: April 24, 2017 12:35 AM2017-04-24T00:35:10+5:302017-04-24T00:35:10+5:30
शिक्षकाकडे गुुरू म्हणून पाहिले जाते. म्हणजेच कुठल्याही अडचणीत गुरू मार्ग दाखवितो. आता हेच पाहा ना, तामिळनाडूच्या
चेन्नई : शिक्षकाकडे गुुरू म्हणून पाहिले जाते. म्हणजेच कुठल्याही अडचणीत गुरू मार्ग दाखवितो. आता हेच पाहा ना, तामिळनाडूच्या कंधाधूया छोट्या गावातील शाळेत आधुनिक सोईसुविधा देण्यासाठी या शिक्षिकेने स्वत:चे दागिने विकले. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अन्नपूर्णा मोहन यांनी केलेल्या प्रयत्नांचे सध्या कौतुक होत आहे. या गावातील गरीब विद्यार्थी पैसे देऊ शकत नाहीत याची जाणीव असल्यामुळेच त्यांनी शालेय साहित्य खरेदीसाठी स्वत:चे दागिने विकले आणि मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून ही शाळा आधुनिक बनविली आहे. या हायटेक शिक्षणामुळे त्यांच्या शाळेतील विद्यार्थी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांसारखे फाडफाड इंग्रजी बोलत आहेत. या शाळेत आता स्मार्ट बोर्ड, रंगीत खुर्च्या, इंग्रजीतील पुस्तके आदी साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही शिक्षणातील उत्साह वाढला आहे.