झाकीर नाईक ‘फरार’ लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:10 AM2017-07-30T01:10:53+5:302017-07-30T01:11:02+5:30
वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईकला विशेष एनआयए न्यायालयाने ‘फरारी’ म्हणून जाहीर केले आहे. न्यायालयाने त्याला ‘फरारी’ जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय
मुंबई : वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईकला विशेष एनआयए न्यायालयाने ‘फरारी’ म्हणून जाहीर केले आहे. न्यायालयाने त्याला ‘फरारी’ जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) त्याची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली.
एनआयएने नाईकविरुद्ध गुन्हा नोंदविल्यावर तो तपास यंत्रणेपुढे उपस्थित राहिला नाही. अटकेच्या भीतीने तो देश सोडून पळून गेला. तपास यंत्रणेने त्याला अनेक वेळा समन्स बजावले तरीही तो भारतात परत आला नाही. त्यामुळे एनआयएने त्याला फरारी घोषित करावे, यासाठी विशेष न्यायालयाला अर्ज केला. तो मान्य करत विशेष न्यायालयाने नाईकला फरार जाहीर केले.
विशेष न्यायालयाने झकीर नाईकला फरारी म्हणून घोषित केल्यानंतर एनआयएने त्याची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली, असे एनआयएच्या अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
एनआयएबरोबरच सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) झकीर नाईकचा साथीदार आमीर गझदार याच्यावर प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवला.विशेष ईडी न्यायालयाने गझदारची जामिनावर सुटका केली आहे. ईडीनेही नाईकला समन्स बजावले, मात्र तो त्यांच्यापुढेही हजर झाला नाही.